Monday, August 19, 2019

शारीरिक शिक्षणाची दशा आणि दिशा: विद्यार्थ्यांच्या नजरेतून!!!

शारीरिक शिक्षणाची दशा आणि दिशा: विद्यार्थ्यांच्या नजरेतून!!!

शिक्षण प्रक्रिया ही विद्यार्थी केन्द्रित असली पाहिजे यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगतात परंतू, त्यावर कृती करणार्‍या खूप मोजक्या शाळा सध्या आहेत. प्रत्यक्षात बहुतांश गोष्टी विद्यार्थ्यांवर लादल्या जातात असे वाटते  शिक्षणतज्ञ  जे कृष्णमूर्ती म्हणतात की, सध्याचे शिक्षण 'हाऊ टू थिंक' हे शिकवत नाही तर 'व्हॉट टू थिंक' हे शिकविते. सध्याच्या स्पर्धात्मक युगात  शिक्षणात इतर विषयांना आणि गुणांना (Marks) अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे संस्थाचालक, मुख्याध्यापक, पालक यांच्या दृष्टिकोनातून शारीरिक शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नाही हे विविध सर्वेक्षणावरून दिसून आले आहे.
शासनाची धोरणे, संस्थाचालक, मुख्याध्यापक व पालकांचा दृष्टिकोन, अभ्यासक्रम आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या आवडीनिवडी या सगळ्या गदारोळात ज्यांच्यासाठी ही शिक्षण व्यवस्था आहे अशा विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाबद्दल काय वाटते  हे जाणून घेण्याचा काही दिवसांपूर्वी प्रयत्न केला. त्यासाठी पुण्यातील एका शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवी मधील 750 विद्यार्थ्यांवर सर्वेक्षण करण्यात आले. शारीरिक शिक्षणाबद्दल शालेय विद्यार्थ्यांचे काय मत आहे? शारीरिक शिक्षण शिक्षकाकडून विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत?, शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचे तास होतात का?, किती होतात?, शारीरिक शिक्षणाची परीक्षा होते का?, विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाच्या तासाला साहित्य मिळते का?, असे काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांची नोंद करण्यात आली. या सर्वेक्षणातील काही प्रमुख निष्कर्ष पुढीलप्रमाणे  

  • शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचे नियमितपणे तास होतात.
  • शारीरिक शिक्षणाचे आठवड्यातून 3 ते 4 तास होतात.
  • शारीरिक शिक्षणाच्या तासाला विद्यार्थी लंगडी,डॉजबॉल, टेन पासेस, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, वॉलीबॉल यासारखे खेळ खेळतात.
  •  शारीरिक शिक्षणाच्या तासाला कोणते खेळ घ्यावे असे वाटते, या प्रश्नाला विद्यार्थ्यांनी फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉल, फुटबॉल हे खेळ घ्यावे असे सांगितले.
  •  नवीन नवीन खेळ शिकवावेखेळाच्या तासाला मैदानावर सोडावे, शारीरिक शिक्षणाचा तास होणे गरजेचे आहे, शारीरिक शिक्षणाच्या तासाला खेळच शिकवावा इतर विषय किंवा गाणी नाही, शारीरिक शिक्षणाचा तास दररोज व्हावा,खेळामधील करियर विषयी माहिती द्यावी अशा विविध अपेक्षा विद्यार्थ्यांच्या शारीरिक शिक्षण शिक्षकाकडून आहेत.
  • शारीरिक शिक्षण तासाला साहित्य मिळत नाही असे उत्तर सर्वच विद्यार्थ्यांनी दिले.
  • शारीरिक शिक्षणाची परीक्षा होते का या प्रश्नाला काही विद्यार्थ्यांनी होते असे म्हटले तर काही विद्यार्थ्यांनी नाही होत असे म्हटले.

सध्याच्या तंत्रज्ञान युगामध्ये विद्यार्थी मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर इसाहित्याच्या सहवासात असूनही विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचा तास असावा आणि तो नियमितपणे व्हावा असे वाटणे हे नक्कीच आशादायी आहेत्याचप्रमाणे शिक्षण प्रक्रियेत विविध विषयांची गर्दी असूनही नियमितपणे आठवड्याला शारीरिक शिक्षणाचे तीन ते चार तास होतात ही सुद्धा सकारात्मक बाब या सर्वेक्षणातून समोर आलेली आहे.शाळेमध्ये शारीरिक शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची कमतरता असूनही विद्यार्थी शारीरिक शिक्षणाच्या तासाला फुटबॉल, कबड्डी, खो-खो, वॉलीबॉल यासारखे मैदानी खेळ खेळतातशारीरिक शिक्षण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजनप्रभावी अंमलबजावणीनाविन्यपूर्ण उपक्रमविद्यार्थी केंद्री अध्यापन शैली,पुरेसे साहित्य आणि उत्साही शारीरिक शिक्षण शिक्षक या सर्व घटकांचे एकत्रीकरण झाले तर शारीरिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करता येण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांनी आपआपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, अभिप्राय जाणून घेतल्यास आपण निश्चितच विद्यार्थी केन्द्रित शारीरिक शिक्षणाकडे टाकलेले ते पहिले पाऊल असेल.

 

शरद आहेर 

चन्द्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे 

मो. 9890025266    

3 comments:

  1. या लेखातून नवीन माहिती मिळाली की विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाच्या करिअर बद्दल माहिती हवी आहे.

    ReplyDelete

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...