Thursday, January 30, 2025

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'





भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच प्रसिद्ध केला असून त्यामध्ये भारतातील शारीरिक शिक्षणाच्या स्थितीबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. हा अहवाल भारताच्या ग्रामीण भागातील 29 राज्य, 605 जिल्हे आणि 15728 शासकीय शाळांमधून मिळविलेल्या माहितीच्या आधारावर तयार केला आहे. या   अहवालात शालेय स्तरावर  शारीरिक शिक्षणाच्या खालील पाच महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला आहे. ते घटक खालीलप्रमाणे


  1. प्रत्येक इयत्तेसाठी आठवड्याला शारीरिक शिक्षणासाठी किती वेळ दिला जातो याचे निष्कर्ष खालील प्रमाणे 

  • २०२४ मध्ये भारतातील ८५ % शाळांमध्ये प्रत्येक वर्गासाठी आठवड्याला शारीरिक शिक्षणासाठी वेळ दिला जातो. 
  • २०२२ मध्ये हा आकडा ७६.८% होता, याचा अर्थ गेल्या काही वर्षांत शारीरिक शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात आहे.
     2. किती शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहेत याचे निष्कर्ष खालील प्रमाणे 

  • २०२४ मध्ये भारतातील केवळ १६.५ % शाळांमध्ये स्वतंत्र शारीरिक शिक्षण शिक्षक आहेत. म्हणजेच भारतातील 83.5% शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा स्वतंत्र शिक्षकच नाही अशाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होणार?
  • केवळ प्राथमिक स्तराचा विचार केल्यास हे प्रमाण 4.8% इतके आहे तर माध्यमिक स्तरावर 30.2% शाळांमध्ये स्वतंत्र शारीरिक शिक्षण शिक्षक आहे.


    3. इतर विषयाच्या किती शिक्षकांकडे शारीरिक शिक्षण या विषयाची जबाबदारी दिलेली आहे याचे                  निष्कर्ष खालील प्रमाणे. 

  • भारतातील 59.6% शाळांमध्ये शारीरिक शिक्षण या विषयाची जबाबदारी इतर विषय शिक्षकाकडे दिलेली आहे. हेच प्रमाण प्राथमिक स्तरावर 66.4% इतके आहे तर माध्यमिक स्तरावर 51.7% इतके आहे. इतर विषय शिक्षक काय बरं शारीरिक शिक्षण घेत असतील? असा प्रश्न पडतो की, हे केवळ कागदी सोपस्कार आहे?
    4. किती शाळांमध्ये क्रीडांगण आहे याचे निष्कर्ष खालील प्रमाणे. 

  • भारतातील 69% शाळांमध्ये क्रीडांगण उपलब्ध आहे. 

    5. किती शाळांमध्ये क्रीडा साहित्य आहे  याचे निष्कर्ष खालील प्रमाणे 

  • भारतातील 82.4% शाळांमध्ये क्रीडा साहित्य आहे. 2018 मध्ये हेच प्रमाण 62.5 इतके होते. या अनुषंगाने क्रीडा साहित्याच्या बाबतीत निश्चित प्रगती झालेली आढळते. 

या संपूर्ण रिपोर्टवर विश्लेषण केले असता असे आढळते की, शाळेमध्ये शारीरिक शिक्षणासाठी वेळ दिला जातो शाळेला मैदान उपलब्ध आहे तसेच शारीरिक शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध आहे परंतु या सर्वांसाठी शारीरिक शिक्षण शिक्षकच नाही ही मोठी चिंतेची बाब आहे. शारीरिक शिक्षण शिक्षक जर नसेल तर इतर सर्व बाबी निरर्थक आहे असे वाटते. एकीकडे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी लगबग सुरू आहेत तर दुसरीकडे 2036 च्या ऑलिंपिकचे यजमानपद मिळवण्यासाठी ही प्रयत्न सुरू असताना भारताच्या शासकीय शाळांमधे शारीरिक शिक्षण शिक्षकांची भरती करायची नाही ही सरकारची परस्पर विरोधी भूमिका आहे असे स्पष्टपणे दिसते. जगभरातील अनेक विकसित देशांमधील विद्यार्थी हे शासकीय शाळेतच शिक्षण घेत असताना भारतामध्ये मात्र शासकीय शाळांची अवस्था अतिशय गंभीर आहे त्यामुळे नाईलाजाने सगळ्यांना खाजगी शाळेत भरमसाठ फी भरून शिक्षण घ्यावे लागते आणि कसे बघायचे विकसित भारताचे स्वप्न?

संदर्भ: ASAR Report 2024 (Physical Education)


प्रा. शरद आहेर

प्राध्यापक, महाराष्ट्रीय मंडळ चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे

14 comments:

  1. अतिशय छान व अभ्यासू विश्लेषण आहे. शिक्षकांची नेमणूक होणे आत्यंतिक आवश्यक आहे

    ReplyDelete
  2. अत्यंत चांगले विश्लेषण आहे पण प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षक हवा

    ReplyDelete
  3. आकडेवारी शारीरिक शिक्षणाची भारतातील स्थिती दर्शविते आहे
    शासन फार काही करेल असं वाटत नाही, परंतु तरीही प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षक नेमण्यासाठी लढा चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर शासनाच्या दोष देऊन बाकी सर्वांनी गप्प गार बसून उपयोग नाही
    माझी खेळाडू, प्रायव्हेट कंपनी, एनजीओ, क्रीडाप्रेमी.... या सर्वांनी तळमळीने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.

    ReplyDelete
  4. सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा व वास्तव परिस्थिती च परखड मत व्यक्त करणारा लेख

    ReplyDelete
  5. शारीरिक शिक्षक हे पद धोक्यात आले आहे.हे पद माध्यामिक शाळेत असून त्यांना पदवीधर म्हणून समजले जाते आहे.ह्या पदाचे कुठलेही व्यापक असे प्रशिक्षण शासन स्तरावरून होत नाही.तसेच शालेय पातळीवर खेळासाठी मोठ्या प्रमाणात मैदान आणि पुरेसे क्रीडा साहित्य नाही त्यामुळे शाळेत या विषयाचे अध्यापन करताना अडचणी येतात

    ReplyDelete
  6. डॉ शरद आहेर सर. नमस्कार,
    आपण दिलेली माहिती अभ्यासपूर्ण आहेच. सध्या बहुतेक शाळां मध्ये क्रीडा शिक्षक भरती केली जात आहे . काही शाळांमध्ये खेळ निहाय त्या त्या खेळातील प्राविण्य मिळविलेल्या क्रीडा शिक्षकांची नियुक्त केलेली आहे .
    शाळेत क्रीडा साहित्यही उपलब्ध आहे . खेळा बद्दल एक प्रकारचे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास आपले क्रीडा शिक्षक प्रयत्न करीत आहेत .
    संस्थाचालकही आपल्या शाळेतील क्रीडा विभागाकडे जातीने लक्ष्य देत आहेत क्रीडा शिक्षकांशी चर्चा करीत आहेत . वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थी सहभाग वाढतो आहे
    फक्त काही शासकीय शाळांमध्ये मात्र क्रीडा विभागाची स्थिती नकारात्मक आहे . क्रीडा शिक्षकाला खेळाचे तास कमी व इतर विषयांचे तास जास्त आहेत . क्रीडा साहित्याचा अभाव आहे . इतर कामाचा व्याप जास्त आहे या कडे शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक वाटते .

    ReplyDelete
  7. Nice one sir.. GOM.. should think seriously about PE..

    ReplyDelete
  8. खूप छान माहिती आहे सर, प्रत्येक शाळेत खेळाचे मैदान व शारीरिक शिक्षण शिक्षक नक्कीच हवा, तरच विद्यार्थी सर्वांगीण विकास व चांगले खेळाडू घडतील, 👍🙏

    ReplyDelete
  9. छान रिपोर्ट सादर केला. ऑलिम्पिक मध्ये मानाचे स्थान प्राप्त करायचे असेल तर प्राथमिक, माध्यमिक शाळेत शारीरिक शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  10. सशक्त व तंदुरुस्त भारत निर्माण करायचा असेल आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक लेव्हल ला मानाचे प्रथम स्थान प्राप्त करायचे असेल तर शारीरिक शिक्षक असणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  11. २०३६ मध्ये भारतात ऑलम्पिक स्पर्धा होणार आहे तरी लवकरात लवकर शारीरिक शिक्षक हा प्रत्येक शाळेत करण्यात यावे अशी केंद्र सरकार व राज्य सरकारला विनंती आहे

    ReplyDelete
  12. प्रत्येक शाळा .महाविद्यालयात. आपण विविध स्तरावर क्रीडा स्पर्धा राबवत असतो परंतु विद्यार्थ्यांना एक चांगला मार्गदर्शनाची गरज असते त्यांना क्रीडा शिक्षक उपलब्ध नसेल तर त्यांना उत्तम गुण कसे प्राप्त होणार आणि ही सर्व जबाबदारी सरकारची आहे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे

    ReplyDelete

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...