![]() |
बालपणीचा आंद्रे त्याच्या वडिलांसोबत |
मैदान बसेल इतकी जागा हवी. त्यांनी तसेच घर शोधले. घर तयार झाले तेव्हा तो म्हणतो माझा तुरुंगच तयार झाला होता. आंद्रे आणि त्याच्या वडिलांमधील द्वंद्व वाचल्यानंतर मला प्रसिद्ध लेखक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचीच आठवण झाली. आंद्रे बालपणीची आठवण सांगताना म्हणतो की, मला कोणीही,एकदाही, चुकूनसुद्धा असे विचारले नाही की, बाळा !!! तुला टेनिस खेळायचे आहे का? आंद्रेचे पूर्ण बालपण केवळ टेनिस,टेनिस, आणि टेनिस मध्येच गेले. त्यामुळेच की काय, जो भेटेल त्याला आंद्रे एकच सांगायचा, I hate Tennis (मी टेनिसचा आत्यंतिक तिरस्कार करतो)
थोड्याच दिवसात आंद्रेची रवानगी 'द निक बोलेटिरी अकॅडमी ऑफ टेनिस' येथे झाली. आंद्रेच्या भाषेत सांगायचे तर, सक्तमजुरीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली होती. त्या ठिकाणच्या कडक शिस्ती विरोधात आंद्रेने अनेकदा बंडखोरी केली, त्याचे मजेदार किस्से पुस्तकात देण्यात आले आहे. तेथूनच आंद्रेच्या व्यावसायिक टेनिसला सुरुवात झाली. त्याकाळातील त्याचे प्रतिस्पर्धी बोरिस बेकर, मायकल चॅग, पीट सॅप्रास यांच्यातील गमती जमती, त्यांच्यात सर्वोच्च स्थान पटकविण्यासाठी चाललेला संघर्ष अतिशय उत्कंठावर्धक रीतीने मांडलेला आहे. त्यांचे स्वभाव, सवयी, संबंध खूप प्रभावी रीतीने मांडलेले आहे. त्यातल्या त्यात सर्वोच्च स्थानासाठी आंद्रेची प्रमुख स्पर्धा ही पीट सॅप्रास याच्याशी होती. त्या काळातील बहुतांश ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरीत ते दोघेच प्रतिस्पर्धी असत. त्यांच्यात रंगलेले अंतिम सामने कागदावर सुद्धा तितकेच रंगविण्यात लेखक यशस्वी झालेला आहे. पीट सॅप्रास आणि आंद्रे दोघेही अतिशय विरुद्ध व्यक्तिमत्त्वाचे खेळाडू होते त्याचे वर्णन मजेशीर पद्धतीने मांडलेले आहे.एवढे वर्ष कठोर परिश्रम केले तरीसुद्धा पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा २२ वर्षांनी जिंकली. त्यामुळे व्यावसायिक खेळाडूंना किती संयम लागतो याची जाणिव होते. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आंद्रेची केशरचना, त्याचे मैदानातील कपडे, सवयी, वर्तन हा खूप चर्चेचा विषय होता त्याबद्दलही खूप सारं विनोदी शैलीत लिहिले आहे. सुरुवातीच्या यशानंतर आंद्रेच्या आयुष्यात असा एक काल येतो की, त्याला सतत अपयश येते. या अपयशामुळे नैराश्य त्याला ग्रासते व तो ड्रग्जचे सेवन करायला सुरुवात करतो व एकवेळ अशी येते की त्याचे जागतिक क्रमावरीतील स्थान १४१ इतके खाली गेले होते. या नैराशेतुन बाहेर येण्यासाठी त्याचा ट्रेनर गिल, मार्गदर्शक ब्रॅड आणि मित्र जे पी यांनी त्याला मदत केली आणि त्यानंतर अगदी नवीन टेनिस खेळायला सुरुवात करतो तशीच सुरुवात आंद्रेने केली. परत कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आंद्रेने प्रथम स्थान पटकावले हा प्रवास वाचकाला खूप काही शिकून जातो.
आंद्रे आणि स्टेफी |
आंद्रेच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते त्यापैकी एक म्हणजे तो अतिशय संवेदनशील होतो. एकदा त्याचा ट्रेनर गिल याच्या मुलीचा अपघात होतो तेव्हा तो रात्रभर गिल बरोबर हॉस्पिटलमध्ये राहतो तसेच तिच्या रूम मध्ये केवळ फॅन असतो आणि तेथे खूप उष्णता असते तेव्हा आंद्रे मोठा ए सी घेऊन येतो आणि बसवतो. असे अनेक प्रसंग पुस्तकात दिलेले आहे ज्यात आंद्रेला इतरांना मदत करतांना खूप समाधान मिळत होते आणि तो अशा संधी सोडत नव्हता. त्याच्या संवेदनशीलतेचा परमोच्य क्षण म्हणजे त्याने सुरू केलेली “आंद्रे आगासी कॉलेज प्रिपरेटरी अकॅडमी” या अकॅडमीच्या माध्यमातून वंचित मुलांना शिक्षणाच्या संधी दिल्या जात आहेत. आंद्रे आगासी फाऊंडेशन फॉर एड्युकेशन च्या माध्यमातून त्याने या अकॅडमीसाठी संडे आठ कोटी डॉलर पेक्षा जास्त निधी जमवला आहे.
आंद्रेने त्याच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर एक हजारपेक्षा जास्त सामने खेळले आहे. आठ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहे ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि चारही ग्रँड स्लॅम जिंकून 'गोल्डन स्लॅम' मिळविणारा तो एकमेव पुरुष खेळाडू आहे.
"ओपन" वाचून फक्त आंद्रे आगाशीचे आयुष्य कळत नाही, तर तुमच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो. प्रत्येकाने वाचायलाच हवे असे हे आत्मचरित्र आहे.
शरद आहेर
प्राध्यापक, चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे
Nicely written sir🙏
ReplyDeleteखुपच छान लिहिलय सर
ReplyDeleteछान माहिती मिळाली
ReplyDeleteआंद्रे आगाशी आणि स्टेफी ग्राफ बद्दल अधिक माहिती वाचायला मला नक्की आवडेल तसेच भारतीय खेळाडूनबद्दल लही मला वाचायला आवडेल
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली सर..! यातून खूप काही शिकण्या सारखं लेखन आहे सर 👌🙏
ReplyDeleteएक प्रेरणा देणारे चरित्र, जे अपयशाने आलेले नैराश्य घालवू
ReplyDeleteशकेल,
तुमचा लेख वाचायला घेतला की, संपल्याशिवाय उठावेसे वाटत नाही सर.💯👍 तुमच्यासारखे बनण्याचे प्रयत्न आहेत.💪☺️
ReplyDelete