Wednesday, October 16, 2024

जाता - येता खेळता!!!



शालेय विद्यार्थ्यांनी आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज किमान 60 मिनिटे शारीरिक हालचाली केल्या पाहिजे ही जागतिक आरोग्य संघटनेचे अपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्रत्यक्ष हालचाली यामधील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार 5 ते 17 वयोगटातील 80 % विद्यार्थी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या अपेक्षा पूर्ण करत नाही ही चिंतेची बाब आहे. 

शासकीय धोरणांमुळे शारीरिक शिक्षणाला मिळणारे तास , तंत्रज्ञानाच्या अती वापरामुळे हालचालींवर आलेल्या मर्यादा, अभ्यासाचा ताण अशा अनेक घटकांचा हा परिणाम आहे आणि या घटकांवर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे नियंत्रण नाही त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हालचालींची पातळी वाढविण्यासाठी काही  नावीन्यपूर्ण पर्यायांची, उपक्रमांची आणि कल्पनांची आवश्यकता आहे. 

याप्रसंगी मला आमच्या शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षक चव्हाण सरांच्या वाक्याची आठवण होते आहे, ते म्हणायचे की, शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारात लांब उडीचे पिट असायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी शाळेत येता जाता उड्या मारत जाईल. ही कल्पना आजच्या काळातही इतकी महत्त्वाची आहे कारण, शारीरिक शिक्षणासाठी वेळापत्रकात खूप कमी कालावधी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याअगोदर, छोट्या आणि मोठ्या सुटिदरम्यान आणि शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी  शारीरिक हालचालींसाठी जास्तीत जास्त आकर्षित, प्रेरित  कसे होतील आणि अनौपचारिकपणे हालचाली होतील यासाठी प्रयत्न करावे लागतील. 

विद्यार्थ्यांच्या अनौपचारिक हालचालींना प्रोत्साहन देणारे किमान खालील साहित्य प्रत्येक शाळेत असावे असे सुचवीत आहे.

पहिले साहित्य म्हणजे डबल बार. आमच्या शाळेच्या मैदानात एक डबल बार होता. त्यावर मी शाळा सुरू होण्याअगोदर जाऊन विविध व्यायाम करायचो. आत्ताही महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानात तीन डबल बार ठेवलेले आहेत त्यावर छोटी व मोठी माणसं नियमितपणे विविध हालचाली करताना दिसतात. या साधनाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातांच्या आणि खांद्यांच्या स्नायूंचा विकास होतो. संशोधनानुसार, रोज १०-१५ मिनिटे डबल बारचा वापर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्नायूंची ताकद २०% ने वाढू शकते. याशिवाय, डबल बारचा वापर करताना विद्यार्थ्यांमध्ये भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. 


दुसरे साधन म्हणजे बॉक्सिंग बॅग.बॉक्सिंग बॅग हे विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा आणि ताण कमी करण्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहे. जाता येता विद्यार्थी एकमेकाला


हाताने अथवा पायाने मारत असतात. हेच करण्यासाठी शाळेच्या आवारात जेथून विद्यार्थी ये - जा करतात अशा ठिकाणी जर बॉक्सिंग बॅग असतील तर विद्यार्थी पंचींग आणि किकिंग करतील ज्यामुळे त्यांची ऊर्जा कमी होऊन शाळेतील गैरवर्तन कमी होण्यास मदत होऊ शकेल.  बॉक्सिंगच्या सरावाने हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि नियमितपणे सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये १५-२०% अधिक शारीरिक सक्रियता वाढलेली दिसून येते.

तिसरे साहित्य म्हणजे लाँगजंप पिट. शाळेच्या आवारात जर लाँगजंप पिट असेल तर विद्यार्थी वेळ मिळेल तेव्हा उड्या मारतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांची शक्ती,वेग हे घटक विकसित होतात. एका शाळेतील ५०% विद्यार्थी जे पूर्वी शारीरिक उपक्रमांमध्ये कमी सक्रिय होते, ते लांबउडी पिटमुळे नियमितपणे शारीरिक सराव करू लागले. शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी हे साधन शाळेच्या ग्राउंडवर सहजपणे वापरता येण्याजोगे आणि विद्यार्थ्यांना आनंददायी वाटणारे असते.

विद्यार्थ्यांच्या अनौपचारिक हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यातील DLRS शाळेतील शारीरिक शिक्षण शिक्षक चेतन पाटील यांनी MoSaFit नावाचा उपक्रम सुरू केला आहे. MoSaFit चे ध्येय आहे की, प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली ऍक्टिव्ह झाली पाहिजे. ही संकल्पना समजायला खूप साधीसरळ आहे. Mo- Monday to Sa- Saturday fitness. या तत्वावर MoSaFit काम करते.मोड्युल तयार करताना Gross motor skill, Fine motor skill, Locomotor skill, Non-Locomotor skill, Manipulative skill, Health related Physical fitness, Skill Related Physical Fitness या गोष्टींचा वापर करून मोड्युल तयार केले आहेत. स्कूल मध्ये या मोडयुलचा उपयोग केला आहे यामुळे विद्यार्थी ऍक्टिव्ह झाले, हालचाली वाढल्या. MoSaFit हे इंस्टाग्राम या social media वर play- learn- grow- together या पेज वर ऍक्टिव्ह आहे. 

असे म्हणतात की, “Not All children can become elite athlete but all children can enjoy the benefits of a Physical Active lifestyle”शाळेतील शारीरिक शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देणे हा असतो. परंतु बऱ्याचदा विद्यार्थ्यांना नियमित व्यायामाची सवय लावणे हे शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी एक आव्हान ठरते. या आव्हानाचा सामना करण्यासाठी, शाळेच्या परिसरात डबल बार, लांबउडी पिट आणि बॉक्सिंग बॅग इत्यादी  साधनं उपलब्ध करून देणे विद्यार्थ्यांच्या अनौपचारिक शारीरिक सक्रियतेला चालना देऊ शकतात.


डॉ. शरद आहेर 

प्राध्यापक,महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे 









8 comments:

  1. मुलांनी रोज मैदानावर खेळने काळाची गरज

    ReplyDelete
  2. छान...!!व्यायामाचे पर्याय सांगितले आहेत !¡!!!!👌👌👌👌शाळेतील मैदानावर साहित्य असले की त्याचा वापर होतो...मुले खेळतात....ओपन जीम जिथे आहेत तिथे पण बरीच मुले त्याचा जाता येता वापर करतात व व्यायाम होतो....!!मधली सुट्टी मुलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.मधल्या सुट्टीत मुलं जेवढी मनसोक्त खेळतात,धावतात,पळतात तेवढी इतर कोणत्याच तासाला नाही... सुट्टीत त्यांचेच नियम ,त्यांचेच आखलेले मैदान त्यामुळे कोणाची आडकाठी नसते..दिवस भरात दोन मोठ्या सुट्टया मिळाल्या तरी भरपूर व्यायाम होईल....!!आखलेली मैदाने सुद्धा मुलांना खेळण्यास प्रवृत्त करतात...!!आखलेली मैदान जास्त काळ टिकत नाही...ती वर्षभर आखलेली,अथवा दोरी ठोकलेली ,रंग दिलेली अशी टिकली पाहिजेत त्यातून पण चांगला व्यायाम घडेल...शिक्षकांनी घेतलेल्या व्यायामापेक्षा मुलांनी मुलांसाठी निवडलेल्या खेळातून जास्त व्यायाम घडतो फक्त इजा होण्याच्या शक्यता जास्त असतात!! शरद माळवे यांचा अभिप्राय.

    ReplyDelete
  3. खुप छान मांडणी केली सर ...अभिनंदन
    गणित, सायन्स, या विषयां च्या तासां पेक्षा खेळा च्या तासाला मुलांचा उत्साह अधिकच असतो.. मग ती जिल्हा परिषद ची शाळा असो किंवा इंटरनॅशनल स्कूल असो....
    Just catch the enthusiasm,, groom, guide and develop it,
    you will get the better results in all manner......
    Its all depend on the concern PE teachers creativity and the positive approach of the School management.......
    Thank you for
    .. ( शाळेतल्या स्मृतींना काही वेळ उजाळा मिळाला....
    School service is better than college service my personal openian. )

    ReplyDelete
  4. येता जाता मुले खरच व्यायाम करू शकतात . अन अलीकडच्या काळात तर गरज . छान .

    ReplyDelete
  5. खूपच छान माहिती आहे सर... आणि असे साहित्य असेल तर नक्कीच मुले येता - जाता व्यायाम करतात, आमच्या शाळेच्या आवारात सिंगल बार आणि डबल बार आहे, त्यावर खूप मुले सुट्टीत आणि इतर वेळी त्यावर खेळत असतात, लटकट असतात, आणि त्यातूनच त्यांचा चांगला व्यायाम पण होत असतो, सो असे साहित्य असणे फार गरजेचे आहे... 👌👌🙏

    ReplyDelete
  6. छान लिहिले आहे सर.

    ReplyDelete

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...