Tuesday, August 13, 2019

क्रीडा स्पर्धांमधील औपचारिकता


भाषनांशिवाय स्पर्धा!!!

कुठलीही क्रीडा स्पर्धा म्हटलं म्हणजे एक वेगळाच उत्साह व जोश असतो. क्रीडा स्पर्धा म्हणजे खेळाडूंच्या दृष्टीनेतर एक पर्वणीच असते. त्यांनी केलेला सराव/अभ्यास याचं प्रदर्शन करण्याची मोठी संधी म्हणजे स्पर्धा. स्पर्धेच्या अगोदर चिंता, विरोधी संघातील कमकुवत दुवे याची चर्चा तर स्पर्धा संपल्यानंतर कोण कसे खेळले, कुणामुळे जिंकलो कुणामुळे हरलो याची चर्चा व विश्लेषणहोते. परंतु, स्पर्धांच्या ठिकाणी स्पर्धां शिवायही अनेक गोष्टी असतात,त्यातील महत्त्वाचे म्हणजे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ. या दोन्ही कार्यक्रमांना पाहुण्यांची मोठी फौज तयारच असते. स्पर्धा किती वाजता आहे किंवा किती वाजता सुरू करावयाची आहे, याहीपेक्षा पाहुने आल्यानंतरच स्पर्धेला सुरुवात होते.त्यातच जर पाहूने आहे उशिरा आले तर सर्व खेळाडूंना उन्हातानात ताटकळत इच्छा नसताना थांबावच लागतं. त्यानंतरसुरु होतो तो म्हणजे स्पर्धेचा उद्घाटन समारंभ. आलेल्या पाहुण्यांचे, अध्यक्षांचे स्वागत, स्पर्धेचे प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचे भाषण, अध्यक्षांचे भाषण व आभार. कुठलीही स्पर्धा म्हटलं म्हणजे अशा प्रकारचीऔपचारिकता ही आलीच. स्पर्धेसाठी आलेले प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांना वाटतं की खेळाडू हे आपले भाषण ऐकण्यासाठी आलेले आहेत आणि त्यानंतर हे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष मोठ्या तावातावात सर्व खेळाडूंना उपदेशाचे डोस चालू करतात. खरंतर खेळाडूंना पाहुणे काय बोलत आहेत याच्याशी काहीही देणेघेणे नसते. त्यांचं एकाच गोष्टीकडे लक्ष लागलेलं असतं, ते म्हणजे मला मैदानात उतरून खेळायला कधी मिळेल. परंतु पाहुणे त्यांची ही इच्छा सहजासहजी पूर्ण होऊ देत नाही. कधीकधी प्रश्न पडतो की स्पर्धांमध्ये हा सगळा औपचारिक सोपस्कर आवश्यक आहेच का?

खरंतर स्पर्धांमध्ये खेळाडूंना खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त करून देणे, खेळाडू ज्या मैदानावर खेळणार आहेत ते मैदान चांगले असणे, खेळाडूंना स्वच्छ पाणी प्यायला मिळने, स्पर्धा चालू नसताना खेळाडूंना योग्य बसण्याची व्यवस्था असने, खेळाडूंना जर इजा झाली तर त्यांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध असणेया प्रमाणे स्पर्धा चालू ठेवणे दोन सामन्यांमध्ये योग्य अंतर असणेहे सर्व घटक कुठल्याही खेळासाठी व स्पर्धांसाठी अत्यंत आवश्यक आहे. परंतु स्थानिक पातळीवरील स्पर्धांमध्ये सर्व घटक दुर्लक्षित होताना दिसतात.

स्पर्धा संपल्यानंतर येतो तो बक्षीस वितरण समारंभ. ज्या ठिकाणी खेळाडूंचा गौरव करणे,जिंकलेल्या संघांना अथवा खेळाडूंना पारितोषिकाचे वितरण हे महत्त्वाचे असताना त्यामध्ये सुरुवात होते पुन्हा एकदा प्रास्ताविक, सत्कार, पाहुण्यांची ओळख,पाहुण्यांचे भाषण यासारख्या औपचारिक सोपस्काराची. उद्घाटन समारंभामध्येखेळाडू ज्याप्रमाणे  खेळण्यासाठी ताटकळत थांबलेले असतात आता खेळून झाल्यानंतर बक्षीस घेण्यासाठी परत एकदा ताटकळत बसलेले असतात. भाषनां शिवाय स्पर्धा होऊ शकणार नाहीत का? खरं तर स्पर्धा म्हणजे खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची एक पर्वणीच असते परंतु अशा या स्पर्धेच्या ठिकाणी कौशल्य पाहण्याऐवजी भाषनं ऐकण्याची वेळ सर्वांवर येते.

चला तर मग निश्चय करूया की क्रीडास्पर्धांमध्ये कमीत कमी औपचारिक कार्यक्रम करणे व खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी व सुविधा पुरावा या!

शरद आहेर 
फोन ९८९००२५२६६

No comments:

Post a Comment

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...