Tuesday, August 13, 2019

भाई झाला सर !


भाई झाला सर !
काही वर्षांपूर्वी टीव्ही वर सत्यमेव जयते हा कार्यक्रम होता त्यामधील सत्यघटनेवर आधारित कथा आहे. नागपूरमधील एका झोपडपट्टीमध्ये अखिलेश नावाचा एक १४ वर्षाचा तरुण राहत होता.ज्याप्रमाणे इतर मुलांची वेगवेगळे स्वप्न व आवडीनिवडी असतात तसे अखिलेशचे स्वप्न म्हणजे भाई बनने म्हणजे, गुंड होणे. कुणालाही मारणे, धमकी देणे हे त्याचे स्वप्न व आवडते काम होते.अखिलेश ज्या भागात राहत होता त्या भागामध्ये एक महाविद्यालय होते. या महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक प्राध्यापक विजय बारसे हे होते. अखिलेश आणि त्याचे मित्र एक दिवस असेच महाविद्यालयाच्या आवारात टिंगलटवाळी करत असताना सरांनी त्यांना निरोप पाठविला की तुम्ही फुटबॉल खेळणार का? तर अखिलेशने सरांना विचारले की सर आम्ही फुटबॉल खेळल्यानंतर आम्हाला किती पैसे मिळणार?त्यावेळेस सर म्हटले की तुम्ही जर फुटबॉल खेळला तर मी प्रत्येकाला पाच-पाच रुपये देणार!त्यामुळे अखिलेश आणि त्यांचं टोळकं, फुटबॉल खेळायला तयार झाले. एक ते दीड तास मनसोक्तपणे फुटबॉल खेळले. खेळून झाल्यानंतर ते सरांकडे गेले आणि म्हणाले आम्हाला आमचे पैसे द्या. ठरल्याप्रमाणे सरांनी लगेच खिशातून पाच रुपये काढून त्या विद्यार्थ्यांच्या हातात दिले. उद्या आले तर उद्या परत पैसे मिळतील असे सरांनी सांगितले. त्यामुळे पैसे मिळणार म्हणून ते विद्यार्थी दुसऱ्या दिवशीही परत फुटबॉल खेळायला त्या सरांकडे गेले. अशाप्रकारे नियमितपणे दहा ते पंधरा दिवस ते विद्यार्थी फुटबॉल खेळण्यासाठी मैदानावर जात राहिले. सर दररोज ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पाच-पाच रुपये देत राहिले. परंतु दहा पंधरा दिवस झाल्यानंतर एक दिवशी हे विद्यार्थी खेळायला गेल्यानंतर सर म्हणाले की आज माझ्याकडे पैसे नाही आज खेळू नका. परंतु इतके दिवस सातत्याने खेळल्यामुळे विद्यार्थ्यांचे मन तेथून जायला तयार होईना आणि म्हणून विद्यार्थी सरांना म्हणाले की सर आम्हाला आज पैसे नको पण फुटबॉल खेळू द्या. सरांनी त्यांना तशी परवानगी दिली. आता मात्र ते विद्यार्थी खेळायला येत होते पण सर त्यांना पैसे देत नव्हते.परंतु, काही दिवसानंतर सरांनी फुटबॉल देणेही बंद केले. परंतु आता या विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळण्याची आवड जडली होती. जे विद्यार्थी दारू पिणे, सिगारेट पिणे, गांजा पीने, इतरांना धमकावणे, मारणे या गोष्टींच्या आहारी गेलेले होते तेच विद्यार्थी आता हे सर्ववाईटकृत्य सोडून फुटबॉल च्या आहारी गेले होते.जितके दिवस ते विद्यार्थी फुटबॉल खेळत होते तितक्या दिवस त्या विद्यार्थ्यांनी दारू पिणे, गांजा पीने, धमकावणे, मारणे या कुठल्याही वाईट गोष्टी केल्या नव्हत्या. त्यानंतर एके दिवशी त्या विद्यार्थ्यांची व त्या भागातील इतर गुंडांची हाणामारी झाली या विद्यार्थ्यावर विरुद्ध टोळीने जीवघेणा हल्ला केला परंतु त्यातून कसाबसा हा विद्यार्थी निसटला व पळून गेलाव स्मशानामध्ये जाऊन लपला. कारण त्याला वाटले याठिकाणी आपल्याला कोणीही शोधायला येणार नाही.  काही दिवसांनी तो नियमितपणे आपल्या घरी राहू लागला. घराच्या बाहेर उभा असताना दोन तीन विद्यार्थी त्याच्या घरासमोरून फुटबॉल घेऊन मैदानावर खेळायला चालली होती आणि त्यावेळी अखिलेशला आपले जुने दिवस आठवले.अखिलेशत्या विद्यार्थ्यांच्या मागे मागे चालत फुटबॉलच्या मैदाना पर्यंत गेला. मैदानावर अनेक विद्यार्थी फुटबॉल खेळत होते.अखिलेश दुरून गाडीवर बसून ते सर्व दृश्य पाहत होता. तेवढ्यात त्या मैदानावर सर आले व सरांनी अखिलेशला ओळखले. कारण ते सर म्हणजे त्या महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक प्राध्यापक विजय बारसे हेच होते. तेव्हा सरांनी त्याच्याकडे चौकशी केली की काय सध्या करतोय?तेव्हा अखिलेशने सांगितले की मी फुटबॉल सोडल्यानंतर परत गुंडगिरीची कामे चालू केलेली आहे व हलाखीच्या परिस्थितीत आहे. तेव्हा सर त्याला म्हणाले की तुला दिवसभरा मधील थोडा वेळ असेल तर मैदानावर येऊन मुलांबरोबर खेळत जा! तेव्हा प्राध्यापक विजय बारसे सरांनी त्या विद्यार्थ्याला सांगितले की, तुला या सर्व वाईट कामांपासून दूर जायचे असेल तर तू फुटबॉलच्या मैदानावर ये! कारण फुटबॉलच्या मैदानावर आल्यानंतर तुला असे काम करण्यास वेळही मिळणार नाही आणि डोक्यात विचारही येणार नाही.अशाप्रकारे तो विद्यार्थी आता परत एकदा फुटबॉलच्या मैदानावर येऊन इतर विद्यार्थ्यांबरोबर फुटबॉल खेळू लागला.काही दिवसांनी त्या मैदानावर स्लम सॉकर नावाच्या फुटबॉलच्या जिल्हास्तरीय स्पर्धा भरवण्यात आल्या, ज्यामध्ये गरीब व झोपडपट्टीतील विद्यार्थी सहभागी होतात. अशा या स्लम सॉकर जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये अखिलेशने चांगली कामगिरी केली त्यामुळे त्याची निवड राज्यस्तरीय स्पर्धांसाठी झाली. राज्यस्तरीय स्पर्धेला निवड झाल्यामुळे अखिलेशचांगला सराव करू लागलाव प्रेरित झाला. राज्यस्तरीय स्पर्धेमध्येही त्याने उत्तम कामगिरी केली आणि त्याचे फलित म्हणजे त्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली.राष्ट्रीय स्पर्धांमधून भारतीय संघासाठी जी निवड केली जाते त्यामध्ये ही अखिलेशची निवड झाली.विशेष म्हणजे अखिलेश याची फक्त भारतीय संघातच निवड झाली नाही तर भारतीय संघाच्या कप्तानपदी त्याची निवड झाली. अखिलेश याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघब्राझील येथे स्लम साखर फुटबॉल स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता.
अशाप्रकारे दारूपिणे, सिगारेटओढणे, गांजा पिणे, मारामारी अशी वाईट कृत्यं करणारा एक विद्यार्थी केवळ खेळामुळे काय करू शकतो आणि खेळामुळे त्याचे आयुष्य किती बदलू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अखिलेश होय.  अखिलेश एवढेच करून थांबला नाही तर सध्या तो अशाच झोपडपट्टी मधील विद्यार्थ्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण देत आहे व तो ज्याप्रमाणे फुटबॉल मुळे बदलला तसेच बदल इतर विद्यार्थ्यांमध्ये करणयाचा प्रयत्न करत आहे.एक काळ असा होता की अखिलेश ला सर्व लोक भाई म्हणून ओळखत होते तोच अखिलेश आता फुटबॉलचा सर म्हणून ओळखला जाऊ लागला.
खेळामुळे पारितोषिके मिळतात, आरोग्य चांगले राहते हे ठीकच पण, खेळामुळे जिद्द, चिकाटी, सकारात्मकविचार, सहकर्यावृत्ती,प्रामाणिकपणा अशा जीवन जगण्यासाठी आवश्यक कितीतरी गुणांचा विकास खेळामुळे होतो. मी काहीही करू शकतो हा आत्मविश्वास खेळामुळे येतो. खेळ म्हणजे टाईमपास नसून आयुष्यभरासाठीची गुंतवणूक आहे हे विध्यार्थी व पालकांनी लक्षात घ्यावे. चला तर मग खेळूया!!!


शरदआहेर
प्राध्यापक, चंद्रशेखरआगाशेशारीरिकशिक्षण
महाविद्यालय, पुणे.

2 comments:

  1. खुपच प्रेरणादायी घटने वरील लेख आहे.👌

    ReplyDelete
  2. Saglyansathi ek motivation story ahe nakkich

    ReplyDelete

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...