सीनियर ज्युनियर दरी शारीरिक शिक्षणाला मारक !
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील बीपीएड चे विद्यार्थी दरवर्षी इंटर्नशिपसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांमध्ये दीड महिन्यासाठी जातात. परत आल्यानंतर त्यांच्याशी बोलताना सर्व विद्यार्थी एक गोष्ट आवर्जून सांगतात ती म्हणजे शाळेतील सीनियर शिक्षक काम करू देत नव्हते. दोनच दिवसापूर्वी एका शाळेतील शिक्षकांचाही मला फोन आला व ते शाळेत काय काय उपक्रम राबवत आहे याबद्दल सांगू लागले परंतु, त्याचबरोबर सीनियर शिक्षक प्रत्येक नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये कशी आडकाठी घालतात याची खंत व्यक्त केली. अशा प्रकारची मानसिकता/ वाद सगळीकडेच असतात परंतु, याचे प्रमाण अधिकच वाढले असल्याचे जाणवत आहे. म्हणून आपल्याशी संवाद साधण्यासाठी लिहीत आहे.
अलीकडच्या काळामध्ये शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम, अध्यापन शैली, साहित्य, उपक्रम व एकूणच दृष्टिकोनमध्ये विविध बदल झालेले आहेत. हे नवीन बदल नवीन शिक्षक शाळेमध्ये राबविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. परंतू, हे बदल जुन्या पिढीतील शिक्षकांना माहीत नसल्यामुळे दोन पिढ्यांमधील ज्ञानात दरी निर्माण झाल्यामुळे हे वाद होत असावेत. परंतु, त्यामुळे नवीन शिक्षकांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकूणच समाजात, शासन स्तरावर, शाळेमध्ये शारीरिक शिक्षण या विषयाला अनेक अडथळ्यांना आणि समस्यांना सामोरे जावे लागत असताना आपल्याच जुन्या आणि नव्या पिढीतील शिक्षकांमधील अशी दरी शारीरिक शिक्षण विषयासाठी मारक आहे. शारीरिक शिक्षणातील नवनवीन उपक्रम, कल्पना शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणे हे विषयाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. नवीन शिक्षकांना पाठिंबा, प्रेरणा जर मिळाली तर ते अधिक जोरदार काम करतील. अन्यथा सीनियर शिक्षकांच्या अशा मानसिकतेमुळे नवीन शिक्षक उत्साह थोड्याच कालावधीत कमी होतो परिणामी शारीरिक शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो व शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होते. माझी सीनियर शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी नवीन शिक्षकांना मार्गदर्शन करावे, पाठिंबा द्यावा, प्रोत्साहित करावे आणि शारीरिक शिक्षणातील नवीन प्रवाहा बरोबर जुळवून घ्यावे व नवीन शिक्षकांनी ही सीनियर शिक्षकांना विश्वासात घ्यावे व त्यांचा मान राखला जाईल याची काळजी घ्यावी. शारीरिक शिक्षणाच्या विकासासाठी दोघांचेही योगदान, सहयोग मोलाचे असणार आहे.
सर
ReplyDeleteनमस्ते
सर आपण दिलेले हा लेख खूप महत्वाचा आहेत यावर आपण सगळे नी व physical education department नी यावर विचार करून आगामी काळात काही 3ते6 दिवसाचे कम्पसरी प्रोग्राम/वर्कशॉप समर व्हॅकेशन मध्ये आयोजित करावे
शारीरिक शिक्षण संचालक आणि शारीरिक शिक्षक प्रोग्राम वेगळा असावा