काळानुरूप आपल्या घरातील टीव्ही, लाइट, फ्रीज इ. उपकरणांमद्धे बदल झालेला आहे. त्याप्रमाणे क्रीडा साहित्य खोलीमध्येही काही बदल झालेले आहे. हे बदल या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊ या. सर्वसाधारणपणे क्रीडासाहित्य खोलीमद्धे डंबेल्स, करेला, रिंग हे कवायत प्रकारांचे साहित्य व फूटबॉल, बास्केटबॉल, वॉलीबॉल यासारख्या खेळांचे विविध बॉल असायचे. साधारणपणे मैदाणावर एका बॉल मागे 50 ते 60 विद्यार्थ्यांना खेळताना, पळताना बघतो. शाळेचे मैदान व इमारत कितीही मोठी असली तरी बॉल च्या संखेत फरक पडत नाही. परंतू, कौशल्य अध्ययन करताना सरावाच्या संधी जितक्या जास्त मिळतील तितके अध्ययन चांगले होते असे संशोधांनवरून दिसून येते. त्यामुळे विद्यार्थी साहित्य गुणोत्तर चांगले असणे परिणामकारक अध्ययनासाठी व शाळेतील शारीरिक उपक्रमास पोषक वातावरण निर्मितीसाठी अतिशय आवश्यक आहे.
- कोन: कोन हे क्रीडा साहित्य अत्यावश्यक साहित्य झाले आहे. कारण त्याचा बहुपयोग. कोंनचा उपयोग हा ग्राऊंड मार्किंग साठी, बाऊन्ड्रि म्हणून, दिशाख्तेचे व्यायाम करण्यासाठी, जम्पिंग करण्यासाठी असे विविध उपयोग होतात. कोन हे विविध ऊंची व रंगामद्धे उपलब्ध असतात. विविध रंगाच्या कोनमुळे मैदाना वरील वातावरण उत्चावर्धक होते. आमच्या महाविद्यालयातील एक विद्यार्थी शिक्षक एका खेडे गावातील शाळेत पाठ घेण्यासाठी गेला तेव्हा त्याने मैदानावर कोन मांडल्या नंतर संपूर्ण शाळा ते कोन बघण्यासाठी गोळा झाले होते. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असतांना ही अवस्था का आहे याचा शारीरिक शिक्षण शिक्षकांनी विचार करायला हवा.
- हर्ड्ल्स: कोनप्रमाणेच विविध रंगामद्धे व उंचीचे प्लास्टिकचे हर्ड्ल्सल सध्या उपलब्ध आहे. त्यांचा उपयोग जंपिंगसाठी केला जातो.
- विविध आकाराचे बॉल: विविध आकाराचे व रंगाचे बॉल सध्या उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती कमी आहेत प्रमाणित फूटबॉल, वॉलीबॉल च्या एका बॉल च्या किमतीत 10 ते 15 हे बॉल येतात. त्यामुळे अधिक बॉल घेऊ शकतो. शारीरिक शिक्षण तासात विविध कौशल्या अध्यापनात, मनोरंजनात्मक व मॉडिफाइड खेळ खेळतांना, त्यांचा उपयोग करता येतो. सर्वात मतहत्वाचे म्हणजे या बॉलमुळे विद्यार्थी साहित्य गुणोत्तर वाढविता येते.
- पॅरॅशूट: हे विविध स्थानांतरनीय कौशल्य सरावासाठी व मनोरंजनात्मक खेळांसाठी उपयोगी येते. कलरफुल असल्याने प्रत्येकाला आकर्षित करते व अनौपचारिकरित्या शारीरिक सक्रियता वाढते. पॅरॅशूट हे विविध आकारमध्ये उपलब्ध आहे.
- बिन बॅग: या प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना कॅचींग व थ्रोईंग करण्यासाठी, मनोरंजनात्मक खेळांमद्धे या बिन बॅग चा उपयोग होतो.
- फ्रिस्बी: फ्रिस्बी ही मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय साहित्य आहे. समन्वय वाढविण्यासाठी, मॉडिफाइड खेळ खेळण्यासाठी फ्रिस्बी अतिशय उपयुक्त आहे. फ्रिस्बी विविध आकार आणि कलरमद्धे उपलब्ध आहेत. किमत कमी असल्यामुळे अधिक संखेने घेता येऊ शकतात.
- रिंग: टेनिक्वाइट रिंग च्या स्पर्धा होतात. परंतू, फ्रिस्बी प्रमाणेच समन्वय वाढविण्यासाठी, कॅचींग व थ्रोईंग साठी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
- हुल्ला हुप: या विशेषता मुलींमद्धे अधिक लोकप्रिय आहेत. परंतू, विविध मनोरंजनात्मक खेळांसाठी, प्रात्यक्षिकासाठी व विविध उपक्रमांसाठी यांचा उपयोग होतो.
- दिशाभिमुखता पोल (Agility Pole: दिशाभिमुखतेचे विविध व्यायाम करण्यासाठी पोल सध्या लोकप्रिय होत आहेत.
Agility Pole - शिडी (Ladder): अगिलिटी लद्दर हे सध्या विविध व्यायाम करण्यासाठी लोकप्रिय आहे. रनिंग, जुंपिंग, स्टेपिंग इ. विविध व्यायाम यावर करता येतात. ते विविध आकार व कलरमद्धे उपलब्ध आहेत.
Agility Ladder
हे सर्व साहित्य कलरफुल असल्यामुळे विद्यार्थ्यंना शारीरिक उपक्रम करण्यासाठी आकर्षित आणि प्रेरित करते. कुठलेही साहित्य हे हालचालींमद्धे टिकून राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी महवचे असल्यामुळे क्रीडा साहित्य खोलीमध्ये हे साहित्य असणे आवश्यक आहे. हे साहित्य केवळ असून उपयोग नाही तर त्याचा विद्यार्थ्यांनी जास्तीती जास्त उपयोग करण्यासाठी उपलब्ध करून देणे तितकेच महत्वाचे आहे.
It was very nice article about changing scenario of sports room equipment and giving very innovative idea for development of physical education and sports in school and colleges.
ReplyDeleteGood artiarti
ReplyDeleteVery excellent 👌
ReplyDelete