Monday, January 23, 2023

'असर' की विसर शारीरिक शिक्षणाचा

 


नुकताच २०२२ चा 'असर' ASAR (Annual Status of Education Report) अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.त्यावर वर्तमानपत्रांमधून चर्चा सुरू आहे. ३ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन आणि गणितीय क्रिया अशा मूलभूत अध्ययन क्षमतांची स्थिती कशी आहे यावर 'प्रथम' या संस्थेमार्फत संपूर्ण देशभरात सर्वेक्षण केले जाते. हे सर्वेक्षण १७००२ शासकीय शाळांमध्ये करण्यात आले आहे. 

'असर' वेबसाईटवर गेले असता त्या ठिकाणी शारीरिक शिक्षण अहवाल या शब्दांनी माझे लक्ष वेधून घेतले. शारीरिक शिक्षणाच्या बाबतीतही सर्वेक्षण केले जाते हे बघून मन सुखावून गेले. शारीरिक शिक्षणाच्या या अहवालामध्ये केवळ चार बाबींचा अंतर्भाव आहे त्या खालीलप्रमाणे

१. प्रत्येक इयत्तेसाठी आठवड्याला शारीरिक शिक्षणासाठी किती वेळ दिला जातो ?

२. किती शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहेत ?

3. किती शाळांमध्ये क्रीडा साहित्य आहे ?

४. किती शाळांमध्ये क्रीडांगण आहे. अश्या चार घटकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे ?

या चारही प्रश्नांचे विश्लेषण खालीलप्रमाणे 

१. प्रत्येक इयत्तेसाठी आठवड्याला शारीरिक शिक्षणासाठी किती वेळ दिला जातो या प्रश्नाचे टक्केवारीत विश्लेषण खालीलप्रमाणे 

  • आनंदाची बाब ही आहे की, महाराष्ट्रातील सर्वाधिक शाळा (९६%) म्हणजेच १७००२ शाळांपैकी १६३२१ शाळांच्या वेळापत्रकात शारीरिक शिक्षणासाठी  वेळ दिला जातो.  
२. किती शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहेत याचे शेकडा प्रमाण खालीलप्रमाणे
  • महाराष्ट्रातील केवळ ८.८ % म्हणजेच १७००२ शाळांपैकी केवळ १४९६ शाळेत शारीरिक शिक्षणाचे स्वतंत्र शिक्षक आहे ही धक्कादायक बाब आहे. वरील नकाशावर नजर टाकल्यानंतर असे लक्षात येते की, शासकीय शाळांमधून शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरती होत नाहीये. नवीन शिक्षण धोरण असोत की, फिट इंडिया चळवळ असो या सर्वांच्या अमलबजावणीसाठी तज्ञ शिक्षक असणे महत्त्वाचे आहे. एका बाजूला ऑलिंपिक मध्ये अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळविल्यानंतर सरकार अशा खेळाडूंना करोडो रुपये बक्षीस देते (लोकप्रियतेसाठी?) परंतू अशा प्रकारचे अधिकाधिक खेळाडू तयार होण्यासाठीची मूलभूत गुंतवणूक करायला सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे हे वरील विश्लेषण वरून जाणवते म्हणूनच असे वाटते की,सरकारला शारीरिक शिक्षणाचा पूर्व विसर पडलेला आहे. 

3. किती शाळांमध्ये क्रीडा साहित्य आहे ?

  • भारतातील बहुतांश शाळांमध्ये क्रीडा साहित्य उपलब्ध आहे. क्रीडा साहित्यामध्ये वेगवेगळ्या खेळासाठी व उपक्रमांसाठी वेगवेगळ्या साहित्याची आवश्यकता असते. तसेच जे साहित्य आहे ते विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात आहे की नाही हे सुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे क्रीडा साहित्याचे सर्वेक्षण करतांना कोणते निकष अथवा आधार घेतला ते रिपोर्ट मध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही. 
४. किती शाळांमध्ये क्रीडांगण आहे याचे शेकडा प्रमाण खालीलप्रमाणे 
  • भारतातील बहुतांश शासकीय शाळेच्या आवारात क्रीडांगण आहे हीसुद्धा आनंदाची बाब आहे.
वरील विश्लेषनावरून शारीरिक शिक्षणाच्या सद्यस्थितीत पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. 'प्रथम' सारखी संस्था असे सर्वकष (Comprehensive) सर्वेक्षण करील अशी अपेक्षा करणेही चुकीचे होईल त्यामुळे शाळेमध्ये कार्य करणाऱ्या शिक्षकांनी आपापल्या शाळेतील शारीरिक शिक्षणाची सद्यस्थिती कशी आहे? याबद्दल शालेय स्तरावर काही प्रश्नांची उत्तरे शोधावी असे वाटते.
१. शाळेतील विद्यार्थ्यांची सरासरी शारीरिक सक्रियता (Physical Activity Level) किती आहे?
२. शाळेतील विद्यार्थ्यांची सरासरी सुदृढता (ताकद, रुधिराभिसरण दमदारपणा, लवचिकता) स्तर कसा आहे?
३. शाळेतील विद्यार्थ्यांना विविध खेळातील मूलभूत कौशल्य करता येतात का?
४. शाळेतील विद्यार्थ्यांना (इ.१ ली ते ४ थी.) रनिंग, जम्पिंग, कॅचिंग, थ्रोइंग इ मूलभूत कौशल्यांचा स्तर काय आहे? 

वरील प्रश्नांचा शोध कसा घ्यायचा याबद्दल पुढील ब्लॉगमध्ये चर्चा करू या!

संदर्भ

http://www.asercentre.org/survey/p/418.html

13 comments:

  1. NICE one sir....congratulations..needed such type of artical.and statistical analysis frequently.. GOOD Titled...try to publish in mass MEDIA ...print and. Electronic media....

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you sir !! Will try to publish in print media

      Delete
  2. Nice information sir 👌

    ReplyDelete
  3. it is a real situation of physical Teachers in School But the policy maker are should be a sports person they should have importance of Physical Fitness and Government should give importance to Physical Education Teacher Other wise even in school admission also not giving importance to Teacher and also budget of sports.

    ReplyDelete
  4. धन्यवाद शरद सर. अशा महत्वपूर्ण अहवालावर चर्चा घडवून आणण्यासाठी. मुळात
    शा. शिक्षनाचं उद्दिष्ट केवळ विविध खेळातील पदकप्राप्ती नसून देशातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी उत्तम सवयी शिकवणे व सक्रिय जीवनशैली अवलंबण्यासाठी मदत करणं हे असलं पाहिजे. पण प्रत्यक्ष जीवनामध्ये विविध स्पर्धा आल्या की त्या स्पर्धांमध्ये देशातील किती खेळाडू जिंकले याची चर्चा जास्त होते पण आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने प्रसारित केलेल्या अहवालाची चर्चा मात्र कुठेच होत नाही आपल्या देशातल्या सेडेंटरी लाईफ जगणाऱ्या लोकांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यावर कोणीही चर्चा करत नाही. असो आपण ते काम प्रामाणिकपणे करु या.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर सर.....धन्यवाद!!!

      Delete
  5. आहेर सरांनी, शारीरिक शिक्षण शिक्षकांना, विद्यार्थ्याची ज्या गोष्टी मोजायला
    सांगितल्या आहेत त्यासाठी कोणती मोजपट्टी आहे का व ती
    अद्ययावत आहे का ? सरांनी केलेल्या सुचना योग्यच आहेत , त्याची कार्यवाही
    झाली तर,अधिकस्य अधिकम् फलम् 🙏

    ReplyDelete
  6. Nice information sir

    ReplyDelete
  7. उत्तम!! विसर पडलेल्यानी हा लेख अभ्यासल्यास नक्की असर होईल. अभ्यासपूर्ण सादरीकरण! keep it up

    ReplyDelete

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...