डायमंडची सुरुवात तळातील एका बिंदूपासून होते व तो वरच्या बाजूस रुंदावत जातो. या आकाराचा मतितार्थ असा आहे की, अगदी सुरुवातीच्या शालेय स्तरावर एखाद दुसरे कौशल्य अथवा संकल्पनांचा परिचय करत जावे व जसे विद्यार्थी शिकत जातील तसतसे अधिक कौशल्य व संकल्पना समाविष्ट कराव्या. आपण जसे डायमंड वर, वर सरकु तसा आपण प्राथमिक शालेय स्तरावर प्रवास करत जातो. वरच्या वर्गात प्रवेश झाल्यावर अधिक कौशल्य, संकल्पनांचा शिक्षक परिचय करून देतात. विद्यार्थी जसजसे नवीन संकल्पना अथवा ज्ञान आत्मसात करत जातील तसतसे अधिक ज्ञान कौशल्य संकल्पना शिकविल्या जाव्यात असे या डायमंडच्या तळाचा आकार दर्शवितो.
सुरुवातीच्या काळात म्हणजेच पूर्व प्राथमिक स्तरावर मूलभूत कारक कौशल्य आत्मसात करण्याची संधी विद्यार्थ्यांना द्यावी. त्यालाच आकृतीत पायाभरणी (Building the foundation) असे म्हटले आहे. यामध्ये विविध उपक्रम अथवा खेळ खेळण्यासाठी आवश्यक चालणे, धावणे, उड्या मारणे, वळणे, कॅच करणे, थ्रो करणे, ढकलणे, ओढणे, हिट करणे, ड्रिबल करणे अशा विविध मूलभूत कौशल्यांचे अध्यापन या स्तरावर करणे अपेक्षित आहे. जेणेकरून पाया भक्कम होऊन विद्यार्थी विविध शारीरिक उपक्रम करू शकतील आणी त्यांचा आनंद पुढील जीवनात घेऊ शकतील.
त्यानंतर आपण डायमंडच्या सर्वात रुंद अशा मध्यावर म्हणजेच प्राथमिक व माध्यमिक स्तरावर पोहोचतो त्यावेळी आपला विद्यार्थी विविध खेळांची ओळख करून घेण्यासाठी अनेक उपक्रमात सहभाग घेण्यासाठी सज्ज झालेला असतो. या स्तरावर विद्यार्थ्यांना खूप उपक्रम, खेळ शिकवावेत. सर्व विद्यार्थ्यांना एकच खेळ आवडेल असे नाही तर, प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असू शकतात. तसेच विद्यार्थ्यांना विविध खेळांची अथवा उपक्रमांची ओळख करून दिल्यास विद्यार्थी त्यांच्या भावी जीवनात सक्रिय राहण्याची शक्यता वाढते. त्यालाच वरील आकृतीत Sampling the Menu असे संबोधले आहे. म्हणजे ज्या प्रमाणे हॉटेलमधे गेल्यानंतर मेनूकार्ड दाखविले जाते आणि आपल्याला हवा त्या पदार्थाची निवड आपण करतो त्या रीतीने शारीरिक शिक्षणाच्या तासात विद्यार्थ्यांना विविध उपक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य दिले (Choice) तर विद्यार्थी आनंदाने उपक्रमात सहभागी होतील. शालेय स्तरावर विविध उपक्रम शिकल्यास आपल्याला कोणता उपक्रम आवडतो, जमतो हे विद्यार्थ्याला समजेल उदा. विविध वैयक्तिक खेळ, सांघिक खेळ, रॅकेट स्पोर्ट इ
आपला डायमंड वरील प्रवास जसा वरच्या दिशेने सरकतो तसा विद्यार्थी माध्यमिक ते उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिकलेल्या विविध उपक्रमांतून विशिष्ट उपक्रमाची, खेळाची निवड करावी त्यालाच आकृतीत मार्ग निवड (Choosing the Path) असे संबोधले आहे. आता या अरुंद डायमंडचा आकार पुन्हा निमुळता होत जातो या स्तरावर निर्णयक्षमता, समस्या निराकरण क्षमता, स्व व्यवस्थापन क्षमता इत्यादी विकसित होऊन विद्यार्थी निवडक उपक्रमात पारंगत होऊन काही उपक्रम आजीवन करण्यासाठी तयार होणे अपेक्षित आहे. डायमंडचा हा निमुळता आकार काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणे, विविध पर्यायातून सुयोग्य निवड करणे, निवडक गोष्टी उपक्रमात प्राविण्य मिळवणे व त्यासाठी अथक परिश्रम करणे व त्याचे पर्यावसन आजीवन शारीरिक उपक्रम सहभाग घेण्यात होते हे दर्शवितो. या स्तरावर विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या काही उपक्रमांमध्ये आत्मविश्वासाने सहभाग घेतील आणि प्रावीण्य प्राप्त करतील.
अशा प्रकारच्या प्रक्रियेमधून जर विद्यार्थी गेला तर तो आजीवन सक्रिय राहण्याची शक्यता वाढते शारीरिक साक्षरतेचे प्रमाण वाढेल, शारीरिक शिक्षणाने सुशिक्षित व्यक्ती घडण्यासाठी पोषक वातावरण मिळेल. डायमंड कल्पना आकृतीबंध हा अभ्यासक्रम कसा असावा यावरील अंतिम उत्तर नाही परंतू तो मार्गदर्शक आहे, तर्कशुध्द आहे आणि आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो.
Nice Information sir 👍
ReplyDeletePerfect .. structure for physical education and Sports
ReplyDeleteNice Sir..
ReplyDeleteNice information sir 🙏🏃👍
ReplyDelete