Sunday, July 11, 2021

संघर्षातून उत्कर्ष !!!


 

झरे (ता. करमाळा, जि.सोलापूर) या  अत्यंत खेडेगावातील व आई वडील शेतमजुरी करून पोट भरतात अशा परिस्थितीत एक व्यक्ती मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण  संचालक पदापर्यंत पोहोचते. ही संघर्षमय कथा आहे डॉ.मोहन आमृळे यांची. शालेय शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत पुर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शिक्षणाच्या माहेर घरी म्हणजे पुण्यात येतात. बी.पी. एड ला प्रवेश घेतात. परंतु फी भरण्यासाठी पैसे नसतात. त्यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी त्यांच्या फीचे पैसे देतात. त्यानंतर एम.पी.एड साठीही प्रवेश घेतात. वेगवेगळी कामं करून काही फी ते भरतात तर काही मित्र फी साठी मदत करतात. कधी मेसचे पैसे माफ केले जातात, कधी मित्र भरतात, हॉस्टेलची फी भरण्यासाठीही पैसे नसतात तेव्हा मित्रांच्या रूमवर राहतात. अशा अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत आमृळे सरांनी आपले बी.पी.एड व एम. पी. एड पूर्ण केले. त्यानंतर एका शाळेमध्ये काही दिवस नोकरी केल्यानंतर त्यांना महाविद्यालयामध्ये नोकरी मिळते. 2003 मध्ये पुण्यातील सर्वात मोठे फर्ग्युसन महाविद्यालयात कोणाचाही पाठिंबा आणि वरदहस्त नसतांनाही शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक पदी निवड होते. अशा प्रकारे त्यांच्या संघर्षाचा प्रवास काही प्रमाणत कमी होऊन उत्कर्षाच्या प्रवासाला सुरुवात होते. या संपूर्ण प्रवासात त्यांना प्रा. सुनीता कुलकर्णी, प्रा. पुरुषोत्तम  पटेल, नेस वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत तुलकर, कै. अशोकराव मोरे  व विद्यार्थी सहाय्यक समिती या सर्वांनी आर्थिक व सर्वप्रकारची मदत या संघर्षमय काळात केली. त्यानंतरही स्वस्थ बसत ते आमृळे सर कसले? थोड्याच दिवसात सरांनी विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली. २०१९ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण या पदासाठी सरांची नियुक्ती झाली. थोड्याच कालावधीत सरांनी धडाकेबाज निर्णय घेतले जे क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड (Milestone) ठरत आहे. 

डॉ.मोहन आमृळे यांनी मुंबई विद्यापीठाच्याा संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण  कार्यभार स्वीकारल्यानंतर केलेले बदल पुढील प्रमाणे

१. खेळाडूंना स्पर्धाकाळात मिळणारा दैनिक भत्ता (DA) २५० होता त्याच्यात वाढ करून थोड्याच दिवसात ४५० केला आणि नुकताच तो 1000 रुपये केला.  खेळाडूंना इतका दैनिक आत्ता देणारे मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एकमेव विद्यापीठ आहे.




2. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे बजेट १ कोटीवरुन  वरून ४ कोटी   करण्यात आले. 



३. खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान प्रवास सुद्धा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

४. मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांचे अनुदान २५ लाखावरून १ कोटी ३० लाख करण्यात आली. 

५. आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या महाविद्यालयाला मिळणारे अनुदान १ लाखावरून ६ लाख रुपये करण्यात आले.


६. स्पर्धांमधील गैरप्रकार कमी करण्यासाठी ज्या संघांनी आणि खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असेल अशाच संघांना आणि खेळाडूंना खेळण्यास पात्र ठरविण्यात आले. त्यामुळे सरांवर विविध मार्गांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आमृळे  सर आपल्या मतावर ठाम राहिले. त्यामुळे इतर खेळाडूंवर होणारा अन्याय कमी झाला. 

७. आमृळे सरांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या वर्षी विविध स्पर्धांच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर खेळाडूंची निवड, स्पर्धा आयोजन यासंबंधी वाद-विवाद झालेले निरीक्षणास आले. त्यामुळे पुढील वर्षी सरांनी एक समिती स्थापन करून मुंबई विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या स्पर्धांची एक घटना किंवा धोरण निश्चित करण्यात आले. ज्यामध्ये स्पर्धा आयोजन, स्पर्धांच्या रचना, स्पर्धा पद्धती, खेळाडू निवड पद्धती अशा विविध घटकांबद्दल निश्चित असे धोरण ठरविले. त्यामुळे असे वाद-विवाद टळतील अशी सरांना आशा आहे. विद्यापीठाची ही घटना किंवा धोरण हे इतर विद्यापीठांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. एकूणच मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागामध्ये पारदर्शकता आणून यंत्रणा सुधारण्यावर सर भर देत आहेत जेणेकरून तरुण आणि तरुणी खेळाच्या मैदानाकडे आकर्षिले जातील. या सगळ्याचा परिणाम खूप चांगला दिसत आहे. 

भविष्यामध्ये क्रीडा विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटलायझेशन करण्याचा सरांचा मानस आहे. त्याचबरोबर आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना 50 लाखापासून १ कोटी पर्यंत शिष्यवृत्ती देण्याची सरांची योजना आहे. थोड्याच दिवसांमध्ये ऑलम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे त्यामुळे वर्तमानपत्रात आणि मीडिया मध्ये ऑलम्पिक पदकांबद्दल चर्चा आणि विश्लेषण सुरू होतील. परंतु पदक विजेते निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे रचनात्मक कार्य करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तिंचीही तितकीच आवश्यकता आहे.

मोहन आमृळे सरांच्या कारकिर्दीवर नजर टाकली असता मला महात्मा गांधीजींच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकातील प्रसंग आठवला. महात्मा गांधीजींचे इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण झालेले होते परंतु, चांगले गुण मिळवणे वेगळे आणि प्रत्यक्ष वकिलीचा व्यवसाय करताना त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा? हा मोठा प्रश्न गांधीजींना पडलेला होता, आणि ही अडचण त्यांनी आपल्या काही मित्रांकडे बोलून दाखवली त्यातील एका मित्राने गांधीजींना इंग्लंडमधील एका मोठ्या नावाजलेल्या वकीलाला भेटण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे गांधीजी त्या वकिलांना भेटायला गेले व त्यांच्याकडे आपली अडचण बोलून दाखवली त्यावेळेस त्यांनी गांधीजींना सांगितले की वकिली करण्यासाठी खूप बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती वगैरेची अजिबात आवश्यकता नाही सामान्य प्रामाणिकपणा आणि कळकळ एवढ्याने तुमचे काम भागेल. याच पद्धतीने टोकाचा प्रामाणिकपणा, अत्यंत साधेपणा आणि प्रखर इच्छाशक्ती  डॉ.मोहन आमृळे  सरांचे स्वभाववैशिष्ट्ये आहे. अशाच प्रामाणिक आणि तळमळ असणार्‍या शिक्षकांची आज  केवळ क्रीडा क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला आवश्यकता आहे.

29 comments:

  1. Amazing journey by Amrule sir. Wish him best for upcoming work! Thank you for sharing Sharad sir.

    ReplyDelete
  2. असा उत्साह प्रत्येक शारीरिक शिक्षकाने दाखविला तर आपल्या देशाला नक्कीच क्रीडा क्षेत्रात खूपच चांगले दिवस येतील खूप छान दिशा देणारा लेख सर

    ReplyDelete
  3. मोहन सर खूप मेहनती व जिद्दी आहेत त्यामुळे त्यांनी इतकी उंची गाठली आहे आणि अशा व्यक्ती ची माहिती लिखानाद्वारे आपण मांडली त्याबद्दल शरद आहेर सर आपले आभार व अभिनंदन
    🙏🙏👌👌👌💪💪💪👌👌👌🙏🙏

    डॉ मनोज रेड्डी

    ReplyDelete
  4. Sir you have done Very inspirational struggle.and yes you are an idol for Youth and Young Physical Education teachers. your experience will definitely help us to follow your Path and to Grow physical education. 👌🙏

    ReplyDelete
  5. Sir, You are an idol for Youth , Thank you sir Sharing.

    ReplyDelete
  6. आदरणीय मोहन आमरुळे सर आपण केलेल्या कामास सलाम. सर तुम्ही मोहन सररान बद्दल खुप छान लेख लिहिला आहे..... आपले व डॉ. मोहन अमरुळे सिरांचे अभिनंदन......

    ReplyDelete
  7. Really, it was a hard journey for D.r.Amrule Sir, great achievement and the changes that sir has made are really helpful to the Students and there future...

    ReplyDelete
  8. आदरणीय सर तुमच्या कर्तुत्वाला सलाम.भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  9. सर तुमच्या सारख्या देवमाणसामुळे च आज खेड्या-पाड्या मध्ये सुद्धा खेळाडू तयार होत आहेत परंतु काही खेडे गावातील खेळाडूंना योग्य त्या मार्गदर्शनाची गरज आहे सर तरी आपण खेड्यातील खेळाडूंना कसे जास्तीत जास्त मार्गदर्शन करता येईल व त्यांना कसे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवता येईल या साठी सुद्धा आपण सर योग्य ती संकल्पना अवलंबावी सर....मोहन सर तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सर व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....आपलाच सागर जाधव(मुंबई पोलीस).

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. Very true sir proud of you ur idol for youth

    ReplyDelete
  12. Really very Inspirational story for yoth💐💐

    We are witness of grate changes and development,
    Really we are Very fortune to have a such a great leader who is Continuesly developing for the betterment of Sports.

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. Very inspirational.. and nicely written sir..

    ReplyDelete
  15. खूपच प्रेरणादायी जीवन प्रवास आहे सर.
    शरद आहेर सर आपण नेहमीच अशा अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची ओळख आम्हांला करून देता आणि आमच्या कामात एक ऊर्जा भरत असता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार

    ReplyDelete
  16. Khup Chan lhilay sir vachun prerna milte.

    ReplyDelete
  17. Your contribution towards sports will help many sports lovers ,That helps to change Indian Sports culture.

    ReplyDelete
  18. Preetam Sharad JoshiJuly 13, 2021 at 9:10 PM

    Your contribution towards sports will help many sports lovers ,That helps to change Indian Sports Culture

    ReplyDelete
  19. I have seen Amrule Sir from my college days in Fergusson college. Very hard working and he only concentrates on his job. Salute

    ReplyDelete
  20. After reading about the struggling journey of Dr.Mohan Amrule sir we come to know that there is no substitution for hard work. His character shows the qualities like honesty, dedication towards profession.
    Thank you so much dear Aher Sir for sharing a inspirational personality life struggle. It is Very motivational for us.

    ReplyDelete

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...