Monday, February 8, 2021

शारीरिक शिक्षणाच्या वेळेचे गणित......

 


शारीरिक शिक्षणाच्या वेळेचे गणित......

शारीरिक शिक्षण हा अभ्यासक्रमतील असा एकमेव  विषय आहे जो 21 व्या शतकात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये (Creativity, Critical thinking, Collaboration and Communication) वाढविण्यासाठीचे  एक प्रवेशद्वार आहे. शारिरीक सक्रियतेने मध्ये आजीवन सहभागाचा प्रवेश बिंदू म्हणजे शारीरिक शिक्षण. शारीरिक शिक्षण केवळ अभ्यासक्रमातीलच नव्हे तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा विषय असतानाही शारीरिक शिक्षणासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये किती वेळ दिला जातो ? यासंबंधी जगभरात झालेल्या संशोधनातील काही प्रमुख निष्कर्ष पुढील प्रमाणे 

  • संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (UNESCO) यांच्या मार्गदर्शकानुसार गुणवत्तापूर्ण शारीरिक शिक्षण राबविण्यासाठी आठवड्यामध्ये शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी १२० मिनिटे इतका वेळ द्यायला पाहिजे.
  • प्राथमिक शाळेमध्ये दर आठवड्याला शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी जगभरातील विविध खंडांमध्ये सरासरी किती वेळ दिला जातो तो पुढीलप्रमाणे: आफ्रिका ९७ मिनिट, अशिया  ८४ मिनिटे, युरोप १०९ मिनिटे आणि  अमेरिका १०७ मिनिटे.




  • माध्यमिक शाळेमध्ये दर आठवड्याला शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमासाठी जगभरातील विविध खंडांमध्ये सरासरी दिला जाणारा वेळ पुढील प्रमाणे: आफ्रिका ९६ मिनिट, अशिया  ८५ मिनिटे, युरोप १०५ मिनिटे आणि  अमेरिका १२५ मिनिटे.









या सगळ्या आकडेवारीचा विचार केल्यानंतर पुण्यामध्ये शारीरिक शिक्षण या विषयाला अभ्यासक्रमांमध्ये किती वेळ दिला जातो ?  यासंबंधी एक सर्वेक्षण केले असता असे दिसून आले की, प्राथमिक स्तरावर शारीरिक शिक्षणासाठी आठवड्याला सरासरी १२० मिनिटे वेळ दिला जातो तर, माध्यमिक स्तरावर सरासरी 117 मिनिटे वेळ दिला जातो. ही आकडेवारी खूप छोट्या सर्वेक्षणावर आधारित आहे त्यामुळे ती प्रातिनिधिक असेलच असे नाही किंवा तिचे सामान्यीकरण करता येणार नाही परंतु, निश्चितच समाधान देणारी आहे. 

  • जगभरामध्ये 2000 ते 2013 या दरम्यान अभ्यासक्रमातील शारीरिक शिक्षणाला दिलेला वेळ कसा कमी होत जात आहे हे दर्शवणारा आलेख पुढील प्रमाणे 



प्राथमिक स्तरावर 2000 मध्ये ११६ मिनिटे, 2007 मध्ये १०० मिनिटे  आणि 2013 मध्ये  ९७ मिनिटे वेळ दिला गेला. तर माध्यमिक स्तरावर 2000 मध्ये १४३ मिनिटे, 2007 मध्ये १०२ मिनिटे  आणि 2013 मध्ये  ९९ मिनिटे वेळ दिला गेला.

यावरून असे लक्षात येते की, शारीरिक शिक्षण या विषयासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये दिला जाणारा वेळ हा वर्षागणिक कमी होत आहे. 

विविध सर्वेक्षनावरून असे दिसून आले आहे की, इतर विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बऱ्याचदा शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिकांचा उपयोग केला जातो. या सर्व आकडेवारीवरून आणि  विश्लेषनावरून शारीरिक शिक्षणात कार्य करणाऱ्या सगळ्यांनीच बोध घेऊन पुढील संकल्प करण्याची आवश्यकता आहे.

  1. अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणासाठी दिलेल्या तासिकांची नियोजनबद्ध आणि प्रभावी अंमलबजावणी करणे.
  2. शारीरिक शिक्षणाच्या तासिकांचा उपयोग शारीरिक शिक्षणासाठीच होईल!!! इतर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नाही याची दक्षता प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकाने घ्यावी.
  3. शारीरिक शिक्षणाचा तास हा सर्वसमावेशक असावा जेणेकरून विविध सुदृढता स्तर, कौशल्य स्तर असलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या क्षमतेप्रमाणे शारीरिक हालचाली करण्याची संधी मिळेल 
शरद आहेर
मो. ९८९००२५२६६



19 comments:

  1. अतिसुंदर.. सर.
    अजून सोप्या भाषेत सांगायचे तर शा. शिक्षण शिक्षक हा प्रशिक्षक, पंच किंवा आयोजक म्हणून काम करणे बंद करावे.एकच व्यक्ती ढोल, तुणतुणे व बासरी वाजवु शकत नाही. 😀😀

    ReplyDelete
  2. सर, किती छान लिहिता, मस्तच

    ReplyDelete
  3. आपल्या सर्व शारीरिक शिक्षण शिक्षकांंनी याची अंमलबजावणी करणे खुप गरजेचे आहे.

    ReplyDelete
  4. उत्कृष्ठ मांडणी,
    एक वेगळा सर्वेक्षण....
    अतिशय सोप्या भाषेत सर्वांनी समजेल अशी मांडणी...
    अभिनंदन सर ...

    ReplyDelete
  5. Physical Education and four c, very imp
    Nice one sir👌🙏

    ReplyDelete
  6. अभ्यासू व्यक्तीमत्व

    ReplyDelete
  7. खूप छान माहिती..

    ReplyDelete
  8. सर आपले कार्य व आपले लेख यातून खूप काही अभ्यासायला मिळत असते सोबत प्रेरणा मिळते

    ReplyDelete
  9. खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

    ReplyDelete
  10. सर आपण आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयी असे विचार मांडले ते स्तुत्य असून यापुढेही असंच लेखन त्यावर राबविण्यात येणाऱ्या उपायोजना यावरही विचार होणे गरजेचे आहे सर तुमच्या लेखन कार्याला सलाम

    ReplyDelete

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...