१. आत्तापर्यंत आंतर महाविद्यालयीन स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांच्या महाविद्यालयातील 302 खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळात प्रतिनिधित्व केले आहे.
२. महाविद्यालयांमध्ये आंतर महाविद्यालयीन स्तरापासून अंतर विद्यापीठ स्तरापर्यंत आत्तापर्यंत 132 स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे.
३. आत्तापर्यंत विद्यापीठ, राज्य सरकार आणि भारत सरकार मार्फत २ कोटी 98 लाख रुपयाचे अनुदान मिळविले आहेे.
४. २०१५ मध्ये क्रीडा महोत्सव (अश्वमेध) स्पर्धेचे यशस्वी आयोजन ज्यामध्ये 4000 हजार खेळाडू व पाच खेळाचा समावेश होता.
या मधूनच एकूण 3 इनडोअर स्टेडियम, ४ बास्केट बॉल ग्राउंड, ४ हॉलीबॉल ग्राउंड, ४ कबड्डी ग्राउंड, 4 खो खो ग्राउंड, १ नेट बॉल, १ हँडबॉल, १ बॉल बॅडमिंटन आणि २०० मीटरचा ट्रॅक अशा प्रकारच्या सोयीसुविधा सरांनी एमजीएम महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये विकसित केलेल्या आहेत.या सांख्यिकी माहितीचे वेगळ्या प्रकारे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, मनोज रेड्डी सरांची आत्तापर्यंत एकूण 18 वर्षाची सेवा झालेली आहे. या सेवेमध्ये त्यांचे दर वर्षी सरासरी १७ खेळाडू वेगवेगळ्या स्तरावर खेळलेले आहेत, दर वर्षी सरासरी ७ स्पर्धांचे आयोजन केलेले आहे, तर दर वर्षी सरासरी १ मैदानाचा विकास केलेला आहे आणि दर वर्षी सरासरी १६ लाख ५५ हजार इतके अनुदान शासनामार्फत मिळविलेले आहे.
हे सर्व केवळ सांख्यिकी आकडे नाही तर स्पर्धांचे आयोजन असो की, मैदानांचा विकास असो या प्रत्येक बाबींमध्ये गुणवत्ता घसरणार नाही याची काळजी सर नेहमीच घेतात. त्यामुळेच अहमदपूर मध्ये स्पर्धांचे आयोजन असते तेव्हा संपूर्ण गावांमध्ये एक वेगळाच उत्साह, ऊर्जा आणि वातावरण निर्मिती झालेली असते. या स्पर्धा बघण्यासाठी अहमदपूर मध्ये सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी उसळते. असाच एक प्रसंग यानिमित्ताने सांगावासा वाटतो. 2011 यावर्षी एमजीएम महाविद्यालया मध्ये हँडबॉलच्या आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतातील विविध विद्यापीठांचे ६५ मुलींचे आणि ७५ मुलांचे संघ सहभागी होण्यासाठी आले होते. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी या सर्व संघांची मिरवणूक संपूर्ण गावा मधून काढण्यात आलेली होती. ही मिरवणूक बघण्यासाठी संपूर्ण गावांमधून मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली होती. प्रत्येक चौकाचौकात खेळाडूंवर पुष्पवृष्टी होत होती, खेळाडूंना स्थानिक लोक उस्फूर्तपणे पुष्पगुच्छ देत होते, हार घालत होते. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला अहमदपूर मधील हा पाहुणचार म्हणजे अतिशय सुखद अनुभव होता. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशामध्ये हँडबॉल सारख्या खेळालाही इतकी समाजमान्यता निर्माण होण्यामध्ये मनोज रेड्डी यांचा सिंहाचा वाटा आहे.
याबरोबरच सरांनी चार वर्षे विद्यापीठामध्ये क्रीडा संचालक म्हणून कार्य करताना आणि महाविद्यालयांमध्ये कार्य करताना विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले ते पुढीलप्रमाणे
१. विद्यापीठामध्ये स्पर्धा आयोजनांमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग केला त्यामुळे खेळाडू, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य या सर्वांमध्ये संवाद आणि समन्वय प्रस्थापित झाला
२. खेळाडूंना स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागतो हे ओळखून सरांनी प्रत्येक संघासाठी रेल्वेचे आरक्षण करूनच प्रवास करेल याकडे लक्ष पुरविले.
३. वेगवेगळ्या संघांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आणि त्या प्रशिक्षण शिबिरांसाठी भारतातील नामवंत मार्गदर्शकांना निमंत्रित केले.
या संपूर्ण कार्यामध्ये यशस्वी होण्यामागे मनोज रेड्डी यांची स्वभाव वैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण आहेत. शाळा-महाविद्यालयांमध्ये नवीन रुजू झालेल्या शिक्षकांसाठी ही स्वभाववैशिष्ट्ये मार्गदर्शक ठरू शकतील असे वाटते ती पुढील प्रमाणे.
१. कमी बोलणे आणि कृतीवर लक्ष केंद्रित करणे
२. संस्थाचालकांपासून शिपायापर्यंत, गावातील प्रतिष्ठित व्यक्तीपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांशीच मनोज रेड्डी यांचे संबंध आणि नेटवर्किंग अतिशय चांगले आहे. त्यामुळे या सगळ्या कार्यामध्ये त्यांना सर्वांचाच पाठिंबा आणि सहकार्य लाभते.
३. कोणतेही कार्य करत असताना ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आवश्यक तो पाठपुरावा (Follow up) करणे हे त्यांचे महत्त्वाचे स्वभाव वैशिष्ट्य आहे.
४. प्रामाणिक, निस्वार्थी आणि विनम्र स्वभावामुळे सगळ्यांचाच विश्वास संपादन केला.
५. उत्तमता (Excellence) आणि गुणवत्ता (Quality) यालाच प्राधान्य देतात
तळागाळात अशाच झपाटून काम करणाऱ्या, क्रीडा संस्कृती निर्माण करणाऱ्या कृतिशील कार्यकर्त्यांची आज शारीरिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्राला अत्यंत आवश्यकता आहे.
शरद आहेर
मो. ९८९००२५२६६
सर लेख खूप छान आहे. प्रत्येक लेखामधून नवनवीन माहिती मिळते आहे.
ReplyDeleteVery inspiring for all the PE teachers
ReplyDeleteHigh quality Performance hat's off Dr.Manoj Reddy Sir
ReplyDeleteVery weldone Dr.Manoj Reddy Sir as wel as very good article written by Dr.Sharad Aher Sir
ReplyDeleteWel written sir very informative
ReplyDeleteWhat a dedication . Very nice.
ReplyDeleteअतिसुंदर सर... अत्यंत प्रेरणादायी लेख आहे.
ReplyDeleteक्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशा हिर्याची पारख करुन त्यांना जगाच्या शोरूम मध्ये सजवण्यासाठी तुमच्या सारख्या रत्नपारखी माणसांची गरज आहे.
प्रेरणादायी लेख, लेखन अतिउत्तम धन्यवाद सर🙏☺🙏
ReplyDeleteSuperb.... salute ...
ReplyDeleteआपली क्रीड़ा क्षेत्रात केलीली कामगिरी प्रेरनादायी आहे आपला लेख वाचून क्रीड़ा क्षेत्रात काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल .
ReplyDeleteआपली क्रीड़ा क्षेत्रात केलीली कामगिरी प्रेरनादायी आहे आपला लेख वाचून क्रीड़ा क्षेत्रात काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल .
ReplyDeleteVery inspirational .....
ReplyDeleteA true motivation model for us
खुपच प्रेरणादायी आहे. आपले मनपुर्वक आभार
ReplyDeleteप्रेरणादायी व मार्गदर्शनपर लेख
ReplyDeleteआमच्यासाठी आदर्श व्यक्ती आहेत
ReplyDeleteमनोज रेड्डी सरांच्या कार्याचा मी 2004 पासूनचा साक्षीदार आहे. मनोजने एक क्रीडा प्राध्यापक म्हणून केलेले कार्य खरोखरच सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. क्रीडा क्षेत्रासाठी ची त्याची तळमळ त्याचे योगदान व त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर चे नाव क्रीडा क्षेत्रात फार पूर्वीपासून अग्रेसर होतेच. हे नाव टिकवणे तिथे सोपे नाही हे मी हे क्रीडा प्राध्यापक म्हणून जाणून होतो. मनोजने त्याच्या महाविद्यालयाचे व जिल्ह्याचे नाव केवळ टिकवले नाही तर त्याच्यात मोलाची भर घातली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे क्रीडा संचालक म्हणून केलेल्या कार्याचा मी क्षणा क्षणाचा आता साक्षीदार आहे. शरद सर आपण म्हटल्याप्रमाणे मनोजने एखादे काम हाती घ्यावे आणि ते यशस्वीरित्या पार पाडावे हा तर शिरस्ताच झाला आहे. विद्यापीठात मनोज ने केलेले काम एक मैलाचा दगड म्हणून यापुढे सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. मनोज तुझी उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो व किडा क्षेत्राकरिता तुझ्या मार्फत अशीच चांगली कामे होवोत सदिच्छा.
ReplyDeleteअगदी योग्य व साजेशी उपमा
ReplyDeleteVery excellently
ReplyDeleteVery excellently sir
ReplyDeleteसर लेख खूप छान आहे.
ReplyDeleteलेख वाचून कान आणि मन प्रसन्न झाले
प्रत्येक लेखामधून नवनवीन माहिती मिळते आहे....
अतिसुंदर सर... अत्यंत प्रेरणादायी लेख आहे.
ReplyDeleteक्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अशा हिर्याची पारख करुन त्यांना जगाच्या शोरूम मध्ये सजवण्यासाठी तुमच्या सारख्या रत्नपारखी माणसांची गरज आहे.
मनोज रेड्डी सर म्हणजे एक रांगडा, मर्दानी क्रीडा शिक्षक ,
ReplyDeleteखेळाडूंसाठी जीव ओतून कर्तव्य बजावणारे रेड्डी सर खेळाडूंच्या गळ्यातले ताईत आहेत💪💪💪
डाॅ मनोज रेड्डी सरांचे क्रीडा क्षेत्रातिल योगदान अतुलनीय आहे.
ReplyDeleteत्यांच्या विषयिचा अत्यंत सुंदर लेख आपण येथे प्रसिद्ध केल्या बद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!
Great 👍🏻
ReplyDelete