कर के देखो
काही दिवसांपूर्वी मी शारीरिक शिक्षणातील उपक्रम यासंबंधी
एक सर्वेक्षण केले व त्याला महाराष्ट्रातील 358 शारीरिक शिक्षण शिक्षकांनी प्रतिसाद
दिला. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांमध्ये चाललेल्या चांगल्या उपक्रमांचे संकलन
करून ते जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचविणे, शारीरिक
शिक्षणातील जे ‘अॅक्टिविस्ट’ आहेत (म्हणजे
आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष कृती करणारे) यांचे कार्य सर्वांसमोर आणणे, चांगल्या कामाची चर्चा घडून आणणे हा त्यामागचा उद्देश आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये शासकीय धोरणामुळे
शारीरिक शिक्षण शिक्षकांमध्ये नैराश्याचे व चिंतेचे वातावरण तयार झाले
आहे. परंतु शासनाचे धोरण काहीही असले तरी प्रत्यक्ष मैदानावर काम करणारा शारीरिक
शिक्षण शिक्षक कसे काम करत आहे याची झलक या सर्वेक्षणांमधून समोर आली आहे. शिक्षकांची
तळमळ आणि उस्फूर्तता हेच घटक शिक्षण प्रक्रियेत परिणामकारक आहे हे दिसून येते. विकासाच्या
नावाखाली सिमेंटच्या जंगलामध्ये आणि मोबाइल-टीव्ही
च्या विळख्यामद्धे विद्यार्थ्यांना खेळायला, हुंदडायला मिळते आहे का? त्यासाठी काय प्रयत्न वेगवेगळे शिक्षक करत आहे? हे थोडक्यात
मांडायचा प्रयत्न केला आहे. या माहितीचे सामान्यीकरण (Generalization) करावे किंवा नाही? माहितीची सत्यता किती? याबद्दल मतांतरे असू शकतील. परंतु मिळणारा प्रतिसाद आणि उपक्रम उत्साह
वाढवणारे आहे. कारण, याठिकाणी दिलेले उपक्रम केवळ कल्पना
किंवा तत्वज्ञान नाही तर शाळेमध्ये प्रत्यक्ष राबविलेले आहे त्यामुळे ते आपणास विचार
आणि कृती करण्यास प्रवृत्त करतात. म्हणूनच या लेखाचे शीर्षक ‘कर के देखो’ असे दिले आहे.
विविध शाळांमधून चाललेल्या उपक्रमांचा सारांश पुढीलप्रमाणे
1.
लेझिम या महाराष्ट्रीय तालबद्ध बाबीला आता एरोबीक्स आणि
झुंबा या आधुनिक आणि आजच्या तरुण तरुणींना आवडणार्या उपक्रमाची साथ विविध
शाळांमधून मिळत आहे
2.
स्पर्धा म्हणजे शालेय मुलांचा जीव की प्राण परंतु, शाळेतील
सर्व विद्यार्थ्यांना आंतर शालेय स्पर्धेत भाग घेता येत नाही म्हणून बर्याच
शाळांमध्ये आंतरकुल स्पर्धा (दर महिन्याला/आठवड्याला) मोठ्या प्रमाणावर चालू आहे
जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धांचा अनुभव देता येतो व शाळेमध्ये
क्रीडा संस्कृती निर्माण व्हायला मदत होते. या स्पर्धांमुळे विद्यार्थी खुप आनंदी असतात आणि त्यामुळे दररोजच्या
ऍक्टिव्हिटी मध्ये सक्रिय सहभाग दर्शवतात असेही एका शिक्षकाने नमूद केले आहे.
3.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे दररोज सामूहिक सूर्यनमस्कार,
फिटनेस अॅक्टिविटी घेतल्या जातात. तर इंदापूर येथील शाळेत १ ली ते ४ थी ३० मि
दररोज मूलभूत कौशल्यांवर आधारित उपक्रम तर ५ वी ते १० वी वेगवेगळ्या पाच खेळांचे
दररोज ६० मि अध्यापन केले जाते.
4.
पुण्यातील एका शाळेमध्ये वर्षभर दररोज एक तास (60 मि)
अॅथलेटिक्स, मल्लखांब व जिमनास्टिक्स यापैकी विद्यार्थ्यांच्या निवडीनुसार
तास घेतले जातात. एका बाजूला शारीरिक शिक्षणाच्या तासांची संख्या कमी होत असतांना
असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाठी महत्वपूर्ण आहे
5. एका शाळेमध्ये मधल्या सुट्टीचा उपयोग शारीरिक शिक्षणासाठी
केला जातो. त्यामध्ये खो खो, वॉलीबॉल, बॅडमिंटन यासारख्या
खेळांच्या नियमामध्ये बदल करून स्पर्धा घेतल्या जातात तसेच चेस, कॅरम याचे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. अश्याप्रकारे बोरीवलीच्या
शाळेमध्ये हा नावीन्यपूर्ण उपक्रम चालतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशाप्रकारचे
उपक्रम मोठ्या प्रमाणावर चालू आहे.
6.
नगर जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षक शाळेमध्ये धाडसी
खेळाचे प्रशिक्षण, होर्स रायडिंग, रायफल शूटिंग याचे
प्रशिक्षण देत आहे
7.
हॅप्पी अवर (प्रत्येक शुक्रवारी) या नावाने एका शाळेमध्ये
उपक्रम राबविला जातो त्याअंतर्गत विविध खेळांच्या स्पर्धा,
चित्रकला यासारखे उपक्रम घेतले जातात
8.
ओतूर (जुन्नर) येथील शिक्षकाने संगीतलेले उपक्रम त्यांच्याच
शब्दात पुढीलप्रमाणे
“दर वर्षी प्रत्येक वर्गाच्या विदयार्थांच्या निवड चाचणी घेऊन ज्या
विद्यार्थ्यांची एनर्जी लेव्हल आणि ज्याच्या मध्ये आवड व विशेष गुण दिसतात अशा
विदयार्थ्यांना रोज संध्याकाळी त्या त्या गुणांमधून इव्हेटसाठी क्षमतेनुसार सराव
करून घेतला जातो . रोज ४० पेक्षा जास्त विद्यार्थी नियमीत वर्षभर सराव करत आहेत . सर्व विद्यार्थी फिटनेस पासून
ते प्रोफेशनल सराव करून घेतला जातो . त्याच बरोबर शाळेतील ज्या विदयार्थ्यांनमध्ये फॅट्स चे प्रमाण
जास्त आहे अशा विदयार्थ्यांनच्या पालकांशी चर्चा करून त्या मुलाना फिटनेस साठी ग्राऊड
वर बोलवतो . तसेच त्यांचा संपूर्ण डायटप्लानसह
त्यांच्यावर लक्ष ठेवले जाते . वर्षभर शाळेतील सर्व मुलांना
खेळासाठी प्रोत्साहीत करून नियमित सरावासाठी वर्षभर बोलावण्याचा प्रयत्न असतो .
9.
ओपन जिम हे सध्या शहरी भागामद्धे चांगलाच लोकप्रिय आहे.
याचाच उपयोग शाळेमध्ये पुण्यातील एका शिक्षकाने केला आहे. तसेच वयोगाटानुसार
फिटनेस स्पर्धा, आजारी न पडणार्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो
10.
शारीरिक शिक्षणाच्या परीक्षा या पहिली ते दहावी
पर्यंत घेतल्या जातात. तसेच शारीरिक शिक्षण या
विषयाचे वेगळे प्रगती पुस्तक आहे.
11.
स्थूल व शारीरिक कमजोर विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या अगोदर व
नंतर शारीरिक शिक्षणाचा विशेष कार्यक्रम राबविला जातो किवा शारीरिक शिक्षण तासाला
सुद्धा ते करू शकतील अश्या अॅक्टिविटी दिल्या जातात. 2 ते 3 शाळांमध्ये असे स्थूल
विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम चालू आहे ही अतिशय समाधानकारक बाब आहे.
12.
आठवड्यातून एक दिवस सर्व शिक्षकांसाठी टिम बिल्डिंग उपक्रम
घेतले जातात
13.
पालक शिक्षक संघाच्या माध्यमातून वर्षभरातील दोन उत्कृष्ट
खेळाडूंना रु. 20000 दिले जातात.
असे म्हणतात की, ‘एखादा प्रश्न जर
सुटायचा असेल तर त्या विषयाचे साहित्य निर्माण व्हावे लागते त्यामुळे तो प्रश्न
सुटायला मदत होते.’ हे वाक्य मला नेहमीच प्रेरित करते. मी लिहू
शकतो का?त्याला साहित्य म्हणता येईल का? असे आपल्यासारख्या शिक्षकांना प्रश्न पडतात. परंतु,
शिक्षणतज्ञ हेरंभ कुलकर्णी म्हणतात की, साहित्य म्हणजे काही अप्राप्य
गोष्ट नाही. शिक्षकांनी आपल्या शाळेतील अनुभव लिहायला सुरुवात केली पाहिजे. आपल्याला
असे वाटतं, की आपल्या अनुभवात तसं काही विशेष नसतं. हे अनुभव
सर्वच घेतात. पण तसं नसतं. म्हणूनच म्हणतात की, “As
you write personal and personal, it becomes universal and universal.” या अर्थाने आपण जितके आपले व्यक्तीगत अनुभव मांडत राहू, तितके ते जगाला आपले वाटतात.
शरद आहेर (9890025266)
चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण
महाविद्यालय, पुणे
आपण सुरू केलेला उपक्रम हा स्तुत्य आहे. यातून प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकाला विविध शाळेत सुरू असलेले उपक्रम कळतील व त्यातून काही नवीन सुरू करण्याची प्रेरणा मिळेल.
ReplyDeleteधन्यवाद!!!
DeleteExcellent work sir...
ReplyDeleteKeep it up...
This kind of small - small studies will help to resolve many problems of Physical Education.
We appreciate your work.
Thank you very much!!!
Deleteएकच नंबर सर
ReplyDeleteSir aapan jo upakram suru kela ahe tyat aamhi sahabhagi ahot.
ReplyDeleteTyacha aamha sarva P.T shikshkanna nakkich fayada hoil.
Dhanyawad
Sir kup chan mahiti ahe....nakkich use hoil...Thank you so much
ReplyDeleteवेगवेगळ्या शाळेतील उपक्रम स्तुत्य आहे, हे उपक्रम नक्कीच राबवण्यास सोपे व कमी खर्चिक आहे, शिक्षकाला फक्त कामाचा उत्साह असणे आवश्यक आहे, तुम्ही आमच्या पर्यंत कल्पना पोहोचवल्या त्या बद्दल धन्यवाद सर. शारीरिक शिक्षण मध्ये कार्यशाळा व उपक्रम असल्यास नक्कीच कळवा.
ReplyDeleteखूपच छान उपक्रम आहे सर, यातून प्रतिकूल परिस्थितीत काय करू शकत नाही पेक्षा काय करू शकतो हे नक्कीच समजले
ReplyDeleteKhup chan sir khup khi navin shikayla bhetel sir
ReplyDeleteReally inspiring Sir
ReplyDeleteWill follow it definitely
खूपच स्तुत्य उपक्रम आहे सर, यामुळे वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयात जे शारीरिक शिक्षण आतंर्गत उपक्रम राबविले जातात त्यांची माहिती उपलब्ध होऊन त्याचा उपयोग आपल्या महाविद्यालयात ग्राउंड व साहित्याच्या उपलब्धतेनुसार करता येईल
ReplyDeleteThank you so much Sir
खूप चांगल्या प्रकारे उपक्रम राबवला गेला ज्यामुळे वेगवेगळ्या शाळांमध्ये कोण कोणते उपक्रम राबवले जातात याचा आढावा मिळाला त्याचबरोबर शारीरिक शिक्षण क्षेत्रामध्ये काय चालू आहे हे सुद्धा समजून आले खूप मस्त काम केलं सर थँक्स
ReplyDeleteखुप महत्वाचे आहे, एकमेकांमध्ये सवांद होणे, बोलता येत नाही पण अशा पद्धतीने सवांद खुप गरजेचा आहे, ही सुरुवात आहे हहे म्हणायला काही हरकत नाही.👍
ReplyDeleteखूप छान उपक्रम आहे,एकमेकांचा संवाद घडवून आणला आहे,त्यामुळे आपापल्या शाळेत उपक्रम घेऊ शकतो
ReplyDeleteSuperb
ReplyDelete