Thursday, May 6, 2021

अनोखी स्पर्धा अडथळ्यांची !


अनोखी स्पर्धा - अडथळ्यांची !


 

स्पर्धा म्हटली म्हणजे कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल यासारख्या खेळांची आठवण होते. या खेळांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी विशेष कौशल्यांवर प्रभुत्व मिळवावं लागतं, त्या खेळातील कौशल्य, डावपेच यांचा सराव करावा लागतो.आणि त्यानंतर स्पर्धेत सहभागी होतात. निरीक्षणावरून असे लक्षात येते की, विशिष्ट खेळ खेळणारे अथवा विशिष्ट खेळातील कौशल्यांवर प्रभुत्व मिळविले निवडक विद्यार्थीच शाळेमध्ये असतात. कोणत्याही खेळांमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी स्व क्षमता, वैयक्तिक आवड-निवड, कौटुंबिक पार्श्वभूमी, शालेय वातावरण, सोयीसुविधा, स्व प्रेरणा इ घटक कारणीभूत असतात. त्यामुळे शाळेत असणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी बरेच विद्यार्थी वरील काही कारणांमुळे स्पर्धात्मक खेळांमध्ये सहभागी होत नाही. त्यामुळे काही विद्यार्थी स्पर्धात्मक अनुभवापासून वंचित राहतात. 

त्यामुळेच चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक सुदृढता, शारीरिक सक्रियता आणि शारीरिक साक्षरता या घटकांची जागृती निर्माण करण्यासाठी, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विशेष कौशल्यांची आवश्यकता नसलेली, स्पर्धात्मक अनुभवापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि आजच्या तरुण तरुणींना आकर्षित करेल अश्या अडथळा शर्यत (Obstyrace) या स्पर्धेची सुरुवात २०१७ पासून केली. 


अडथळा स्पर्धेची काही वैशिष्टे पुढीलप्रमाणे 

  • या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सर्वसाधारणपणे ८ ते १२ इतके अडथळे पार करावे लागतात. 
  • यामध्ये रनिंग,  वस्तू ओढणे, ढकलणे, वस्तूच्या वरुन उडी मारणे, तोल सांभाळत चालणे अशा विविध उपक्रमांचा अंतर्भाव असतो 
  • ही स्पर्धा सांघिक स्वरूपात घेतली जाते. कोणत्याही खेळात एका संघात जास्तीत जास्त ११ खेळाडूंचा सहभाग असतो. परंतु अडथळा शर्यत या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळावी म्हणून 25 विद्यार्थ्यांचा संघ स्पर्धेत सहभागी होतो. 
  • स्पर्धेचे आयोजन अतिशय काटेकोरपणे केलेले असते. सहभागी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी, केळी, बसण्याची व्यवस्था, स्पर्धेदरम्यान विविध मनोरंजनात्मक उपक्रम, झुंबा यांचा अंतर्भाव केला जातो जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंददायी अनुभव यावा.
  • स्पर्धा अडथळ्यांची असल्यामुळे दुखापतीची शक्यता असते हे लक्षात घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी पूर्णवेळ ॲम्बुलन्स व डॉक्टर उपलब्ध असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ उपचार मिळतात. 
  • स्पर्धा म्हटल्या म्हणजे विजेत्या आणि उपविजेत्या संघांनाच केवळ पारितोषिके मिळतात. परंतु या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट मुलांच्या १२ संघांना आणि मुलींच्या ८ संघांना पारितोषिके दिली जातात. सहभागी होणाऱ्या तेक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र दिले जाते.

  • सर्वसाधारणपणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन आणि नियोजन उत्कृष्ट दर्जाचे असते. परंतु आंतरशालेय स्पर्धेमध्ये सुद्धा त्याच दर्जाचे उत्तम आयोजन आणि नियोजन अनुभवण्याची संधी सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे दिली जाते. 
महत्व: 
  • शारीरिक सुदृढता, आव्हान Challenge) आणि मनोरंजन हे एकाच उपक्रमातून साध्य 
  • ताकद, दमदारपणा, शक्ती, चपळता, वेग अशा विविध सुदृढता विकास एकाच उपक्रमातून 
  • उपलब्ध जागेत करता येतो 
  • अडथळा कायमचा (permanent) असल्यास विद्यार्थी मिळेल त्या वेळेत, मधल्या सुट्टीत करतात 

दर वर्षी या स्पर्धेमध्ये पुणे शहरातील ७० ते ८० शाळा सहभागी होतात. दर वर्षी स्पर्धेच्या स्वरूपामध्ये काहीतरी नाविन्यता आणण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न असतो. अडथळा स्पर्धा ही केवळ स्पर्धाच नसून शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाच्या तासाला नियमितपणे घेण्याचा एक उत्तम उपक्रम सुद्धा आहे. नियमित व्यायामापेक्षा वेगळे आणि आव्हानात्मक उपक्रम असल्यामुळे विद्यार्थी याकडे आकर्षिले जातात आणि नकळत विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता वाढण्यास मदत होते तसेच  शारीरिक सक्रियता  पातळी उंचावण्यास ही मदत होते. सध्या ही स्पर्धा केवळ पुणे शहरापुरती मर्यादित आहे.या उपक्रमासाठी विशिष्ठ मैदान लागते असे नाही तर, शाळेमध्ये जी काही जागा असेल त्या जागेमद्धे हा उपक्रम घेता येतो. शाळेच्या पायर्‍या, उंच भाग, खोल भाग अशा शाळेतील नैसर्गिक घटकांचा उपयोग अडथळ्यांसाठी करता येतो. परंतु प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकाने आपापल्या शाळेत अडथळा शर्यत स्पर्धेची किंवा उपक्रमाची अंमलबजावणी केल्यास इतर खेळाच्या स्पर्धेत सहभागी न होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती एक मेजवानीच  ठरेल. 





17 comments:

  1. You and your team are always trying to do something different and this is one of them. best wishes

    ReplyDelete
  2. खूप छान उपक्रम 🙏 विविध शारीरिक सदृढता क्षमतांचा विकास एकाच उपक्रमातून साध्य केला जातो

    ReplyDelete
  3. शाळेच्या विद्यार्थ्यांना हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. एवढ्या मोठ्या संख्येने यामध्ये संघ सहभागी होतात व त्यांची यथोचित काळजी घेतली जाते (सुरक्षा, पाणी, नाश्ता) हे खरंच कौतकास्पद आहे. तसेच विजेत्या संघांना खेळाच्या व व्यायामाच्यावस्तूच बक्षीसम्हणूनद्यायच्या ही संकल्पना खूपच छान आहे. चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाचे त्रिवार अभिनंदन.

    ReplyDelete
  4. शाळेच्या विद्यार्थ्यांना हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. एवढ्या मोठ्या संख्येने यामध्ये संघ सहभागी होतात व त्यांची यथोचित काळजी घेतली जाते (सुरक्षा, पाणी, नाश्ता) हे खरंच कौतकास्पद आहे. तसेच विजेत्या संघांना खेळाच्या व व्यायामाच्यावस्तूच बक्षीसम्हणूनद्यायच्या ही संकल्पना खूपच छान आहे. चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाचे त्रिवार अभिनंदन.

    ReplyDelete
  5. शाळेच्या विद्यार्थ्यांना हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. एवढ्या मोठ्या संख्येने यामध्ये संघ सहभागी होतात व त्यांची यथोचित काळजी घेतली जाते (सुरक्षा, पाणी, नाश्ता) हे खरंच कौतकास्पद आहे. तसेच विजेत्या संघांना खेळाच्या व व्यायामाच्यावस्तूच बक्षीसम्हणूनद्यायच्या ही संकल्पना खूपच छान आहे. चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाचे त्रिवार अभिनंदन.

    ReplyDelete
  6. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अतिशय छान असा उपक्रम सन २०१६ पासून चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने चालू केला आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक शाळा यामध्ये समाविष्ट होतात. जे विद्यार्थी सुदृढ आहेत अश्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम असा प्लॅटफॉर्म आहे. मैदानावर स्वतःचे व संघाचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अडथळा शर्यतीत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात. महाविद्यालयातर्फे अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन केले जाते. स्पर्धा आयोजन व व्यवस्थापन कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे obstyrace स्पर्धा.आलेल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते. विजेत्या संघास दिलेले बक्षीस हे शाळेस व विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण पाठास उपयुक्त असे असते. अतिशय उत्तम असा उपक्रम त्याबद्दल प्रा.डॉ.शरद आहेर व प्रा.डॉ.योगेश बोडके विशेष अभिनंदन व महाविद्यालयाचे ही अभिनंदन.

    ReplyDelete
  7. खुपच छान सर. ही स्पर्धा म्हणजे शा. शि. क्षेत्रातील एक क्रांती आहे. धाटणीतल्या त्याच त्या स्पर्धा खेळून मुले कधी कधी कंटाळतात. कधी कधी खेळ सोडतात. बरेचदा 14 वर्षांखालील टीम एकदा काढली की तीच टीम पुढील वयोगटांमध्ये खेळताना दिसते. त्यामुळे जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमधून काही मुले इच्छा असताना निवड चाचणीला उतरत नाहीत. त्यामुळे योग्यता असणारे बरेच खेळाडू घडण्या अगोदरच खेळणे बंद करतात. अशा सर्वांसाठी ही स्पर्धा एक उत्तम पर्याय आहे.

    ReplyDelete
  8. खुपच छान सर. ही स्पर्धा म्हणजे शा. शि. क्षेत्रातील एक क्रांती आहे. धाटणीतल्या त्याच त्या स्पर्धा खेळून मुले कधी कधी कंटाळतात. कधी कधी खेळ सोडतात. बरेचदा 14 वर्षांखालील टीम एकदा काढली की तीच टीम पुढील वयोगटांमध्ये खेळताना दिसते. त्यामुळे जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमधून काही मुले इच्छा असताना निवड चाचणीला उतरत नाहीत. त्यामुळे योग्यता असणारे बरेच खेळाडू घडण्या अगोदरच खेळणे बंद करतात. अशा सर्वांसाठी ही स्पर्धा एक उत्तम पर्याय आहे.

    ReplyDelete
  9. खुप छान उपक्रम .. मुलं खुप आनंद घेतील.. तंदुरस्त देखील होतील.. FIT INDIA... हार्दिक अभिनंदन सर व शुभेच्छा..

    ReplyDelete
  10. आहे त्या साधनांचा वापर करून अशा शर्यती घेऊन विद्यार्थ्यांना सुदृढतेकडे घेऊन जाऊ शकतो. यात रंजकता असल्याने मुलं उत्साहाने सहभागी होतात.
    खूप छान सर याचा उपयोग होईल हे निश्चित.

    ReplyDelete
  11. सर खूप छान उपलब्ध साधनांचा उपयोग करून आनंद मिळवता येतो .

    ReplyDelete
  12. कमी वेळेत सुदृढतेच्या सर्वच घटकांना स्पर्श करणारा , केवळ स्पर्धा नाही तर नियमित पणे आपल्या व्यायामाच्या प्रगती नुसार व गरजे नुसार अडथळे नियोजित करता येतील असा उपक्रम , खूपच चांगली संकल्पना आहे

    ReplyDelete
  13. Nice...you are really implementing imaginations and your vision is good..

    ReplyDelete
  14. सर हा नाविन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रम आहे. मी ही ग्रामीण भागातून माझ्या शाळेचा सहभाग नोंदवला होता.यात विध्यार्थ्यांना आनंद तर मिळालाच पण मनोरंजनातून विविध साधनाद्वारे आपण हे खेळ खेळू शकतो असा विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच मोठे पारितोषिक होते.याचा मी अनुभव घेतला आहे. यात यशस्वी ही झालो आम्ही.सर्व खेळाडूंना नाश्ता दिला जातो व संगीताच्या तालावर नाचण्यास प्रवृत्त करून थकवा आणि ताण ही कमी करणारे प्रशिक्षक! विजयी संघ व विशेष वेळ नोंदवलेले खेळाडूंना व्यायामाच्या वस्तू देऊन त्यांना सन्मानित केले जाते हा अगदी उल्लेखनीय उपक्रम आहे. असा हा उपक्रम या महाविद्यालयातून राबविण्यात येतो यासाठी मनःपूर्वक अभिनंदन !!!

    ReplyDelete

'असर' चा रिपोर्ट आणि सरकारला शारीरिक शिक्षण शिक्षकांचा 'विसर'

भारतातील शालेय शिक्षणाची सद्यस्थिती दर्शविणारा २०२४ चाअहवाल "असर " या संस्थेने (Annual Status of Education Report - ASER)  नुकताच ...