भिंती उंचावत आहेत... पण विश्वासाची उंची कमी होत आहे?
जगाच्या इतिहासात चीनची महान भिंत ही मानवी बुद्धिमत्तेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक मानली जाते. हजारो किलोमीटर लांबीची ही भिंत एका उद्देशाने उभारली गेली—आक्रमण रोखण्यासाठी. चीनने उत्तरेकडून होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हजारो किलोमीटर लांबीची महान भिंत बांधली. भिंत अतिशय मजबूत होती आणि तिच्यावर पहारा देण्यासाठी सैनिक तैनात होते. पण काही वेळा आक्रमकांनी भिंत फोडली नाही; त्यांनी सीमेवरील सैनिकांना लाच दिली किंवा त्यांची साथ मिळवली, त्यामुळे प्रवेशद्वार उघडले गेले. परिणामी शत्रू सैन्य भिंतीतून सहज आत आले आणि चीनवर आक्रमण करण्यात यशस्वी झाले. "भिंत कमकुवत नव्हती; तिचे रक्षण करणाऱ्या माणसांची निष्ठा कमकुवत पडली."
चीनच्या भिंतीचा हा प्रसंग आठवण्याचे कारण म्हणजे अलीकडेच देशात परीक्षा व्यवस्थेबाबत सुरू झालेली चर्चा.
अलीकडे
परीक्षा
व्यवस्थेतील
सुधारणांसाठी
स्थापन
करण्यात
आलेल्या
कृती
दलातील
सदस्य
व्ही.
कामकोटी
यांनी
एक
महत्त्वाचे
विधान
केले
नवीन समिती
नवा कायदा.
नवे नियम.
अधिक CCTV.
अधिक पासवर्ड.
अधिक एन्क्रिप्शन.
अधिक सुरक्षा.
पण कधी आपण स्वतःला विचारतो का—
या सगळ्याची जबाबदारी सांभाळणारा माणूस किती प्रामाणिक आहे?
आज कृत्रिम बुद्धिमत्ता आली आहे.
ब्लॉकचेन आले आहे.
चेहरा ओळखणारी यंत्रणा आली आहे.
डिजिटल सुरक्षा दिवसेंदिवस मजबूत होत आहे.
पण अजून अशी कोणतीही प्रणाली निर्माण झालेली नाही जी माणसाच्या चारित्र्याची हमी देऊ शकेल.
कारण...
प्रामाणिकतेसाठी अजून कोणताही अल्गोरिदम तयार झालेला नाही.
व्ही. कामकोटी यांनी म्हटले आहे की,
"आपल्याला विश्वास ठेवता येतील असे शिक्षक हवेत."
मी मनात म्हणालो...
हो.
पण फक्त शिक्षकच नाही तर
आपल्याला विश्वास ठेवता येतील असे—
डॉक्टर हवेत.
न्यायाधीश हवेत.
पत्रकार हवेत.
प्रशासकीय अधिकारी हवेत.
उद्योगपती हवेत.
राजकारणी हवेत.
आणि सर्वांत महत्त्वाचे...
विश्वास ठेवता येतील असे नागरिक हवेत.
कारण समाज एका व्यवसायावर उभा नसतो.
तो परस्पर विश्वासावर उभा असतो. खरे पाहिले तर या प्रत्येक व्यवसायाचे भांडवल पैसा नसतो.विश्वास असतो. एकदा तो संपला की संस्था उरते; प्रतिष्ठा संपते. म्हणूनच प्रत्येक युगात प्रश्न तंत्रज्ञानाचा नसतो; तो मूल्यांचा असतो.
शिवाजी महाराजांनी भिंती नव्हे, माणसे जिंकली
भारतीय इतिहासात याच्या अगदी विरुद्ध उदाहरण दिसते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले ते केवळ किल्ले जिंकून नाही.
त्यांनी माणसे जिंकली.
मावळ्यांच्या मनात स्वराज्याविषयी अशी निष्ठा निर्माण केली की प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जीवाची पर्वा केली नाही.
किल्ल्यांची ताकद त्यांच्या दगडी तटांमध्ये नव्हती.
ती त्या तटांवर उभ्या असलेल्या माणसांच्या विश्वासात होती.
म्हणूनच स्वराज्याचा पाया दगडांवर नव्हता.
तो विश्वासू माणसांच्या खांद्यावर उभा होता.
मग उपाय काय?
कठोर कायदे हवेत.
आधुनिक तंत्रज्ञानही हवे.
सुरक्षा व्यवस्थाही हव्यात.
पण त्याचबरोबर एक गोष्ट पुन्हा समाजाच्या केंद्रस्थानी आणावी लागेल.
चारित्र्य.
शेवटी...
चीनने भिंती बांधल्या.
आपण कुलपे बांधतो.
संगणकांना पासवर्ड देतो.
डेटा एन्क्रिप्ट करतो.
कायदे अधिक कठोर करतो.
पण एक प्रश्न अजूनही उरतो...
आपण अधिक सुरक्षित व्यवस्था निर्माण करत आहोत... की अधिक विश्वासू माणसे?
तुमच्या मते समाजाला आज सर्वाधिक गरज कशाची आहे?
कठोर कायदे हवेत.
आधुनिक तंत्रज्ञानही हवे.
सुरक्षा व्यवस्थाही हव्यात.
पण त्याचबरोबर एक गोष्ट पुन्हा समाजाच्या केंद्रस्थानी आणावी लागेल.
चारित्र्य.
शेवटी...
चीनने भिंती बांधल्या.
आपण कुलपे बांधतो.
संगणकांना पासवर्ड देतो.
डेटा एन्क्रिप्ट करतो.
कायदे अधिक कठोर करतो.
पण एक प्रश्न अजूनही उरतो...
आपण अधिक सुरक्षित व्यवस्था निर्माण करत आहोत... की अधिक विश्वासू माणसे?
तुमच्या मते समाजाला आज सर्वाधिक गरज कशाची आहे?
- अधिक कठोर कायदे?
- अधिक आधुनिक तंत्रज्ञान?
- अधिक कठोर शिक्षा?
- की अधिक प्रामाणिक माणसे?
प्रा. शरद आहेर
प्राध्यापक, महाराष्ट्रीय मंडळ चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पुणे

