डॉ.मोहन आमृळे यांनी मुंबई विद्यापीठाच्याा संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण कार्यभार स्वीकारल्यानंतर केलेले बदल पुढील प्रमाणे
१. खेळाडूंना स्पर्धाकाळात मिळणारा दैनिक भत्ता (DA) २५० होता त्याच्यात वाढ करून थोड्याच दिवसात ४५० केला आणि नुकताच तो 1000 रुपये केला. खेळाडूंना इतका दैनिक आत्ता देणारे मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एकमेव विद्यापीठ आहे.2. मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे बजेट १ कोटीवरुन वरून ४ कोटी करण्यात आले.
३. खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान प्रवास सुद्धा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
४. मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांचे अनुदान २५ लाखावरून १ कोटी ३० लाख करण्यात आली.
५. आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या महाविद्यालयाला मिळणारे अनुदान १ लाखावरून ६ लाख रुपये करण्यात आले.६. स्पर्धांमधील गैरप्रकार कमी करण्यासाठी ज्या संघांनी आणि खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असेल अशाच संघांना आणि खेळाडूंना खेळण्यास पात्र ठरविण्यात आले. त्यामुळे सरांवर विविध मार्गांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आमृळे सर आपल्या मतावर ठाम राहिले. त्यामुळे इतर खेळाडूंवर होणारा अन्याय कमी झाला.
७. आमृळे सरांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्या वर्षी विविध स्पर्धांच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर खेळाडूंची निवड, स्पर्धा आयोजन यासंबंधी वाद-विवाद झालेले निरीक्षणास आले. त्यामुळे पुढील वर्षी सरांनी एक समिती स्थापन करून मुंबई विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या स्पर्धांची एक घटना किंवा धोरण निश्चित करण्यात आले. ज्यामध्ये स्पर्धा आयोजन, स्पर्धांच्या रचना, स्पर्धा पद्धती, खेळाडू निवड पद्धती अशा विविध घटकांबद्दल निश्चित असे धोरण ठरविले. त्यामुळे असे वाद-विवाद टळतील अशी सरांना आशा आहे. विद्यापीठाची ही घटना किंवा धोरण हे इतर विद्यापीठांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. एकूणच मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागामध्ये पारदर्शकता आणून यंत्रणा सुधारण्यावर सर भर देत आहेत जेणेकरून तरुण आणि तरुणी खेळाच्या मैदानाकडे आकर्षिले जातील. या सगळ्याचा परिणाम खूप चांगला दिसत आहे.
भविष्यामध्ये क्रीडा विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटलायझेशन करण्याचा सरांचा मानस आहे. त्याचबरोबर आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना 50 लाखापासून १ कोटी पर्यंत शिष्यवृत्ती देण्याची सरांची योजना आहे. थोड्याच दिवसांमध्ये ऑलम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे त्यामुळे वर्तमानपत्रात आणि मीडिया मध्ये ऑलम्पिक पदकांबद्दल चर्चा आणि विश्लेषण सुरू होतील. परंतु पदक विजेते निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे रचनात्मक कार्य करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तिंचीही तितकीच आवश्यकता आहे.
मोहन आमृळे सरांच्या कारकिर्दीवर नजर टाकली असता मला महात्मा गांधीजींच्या सत्याचे प्रयोग या पुस्तकातील प्रसंग आठवला. महात्मा गांधीजींचे इंग्लंडमध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण झालेले होते परंतु, चांगले गुण मिळवणे वेगळे आणि प्रत्यक्ष वकिलीचा व्यवसाय करताना त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा? हा मोठा प्रश्न गांधीजींना पडलेला होता, आणि ही अडचण त्यांनी आपल्या काही मित्रांकडे बोलून दाखवली त्यातील एका मित्राने गांधीजींना इंग्लंडमधील एका मोठ्या नावाजलेल्या वकीलाला भेटण्याचा सल्ला दिला त्याप्रमाणे गांधीजी त्या वकिलांना भेटायला गेले व त्यांच्याकडे आपली अडचण बोलून दाखवली त्यावेळेस त्यांनी गांधीजींना सांगितले की वकिली करण्यासाठी खूप बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती वगैरेची अजिबात आवश्यकता नाही सामान्य प्रामाणिकपणा आणि कळकळ एवढ्याने तुमचे काम भागेल. याच पद्धतीने टोकाचा प्रामाणिकपणा, अत्यंत साधेपणा आणि प्रखर इच्छाशक्ती डॉ.मोहन आमृळे सरांचे स्वभाववैशिष्ट्ये आहे. अशाच प्रामाणिक आणि तळमळ असणार्या शिक्षकांची आज केवळ क्रीडा क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला आवश्यकता आहे.